साद्राबाडीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 09:48 PM2018-09-08T21:48:59+5:302018-09-08T21:49:15+5:30

धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथील भूकंपसदृश घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शनिवारी साद्राबाडीला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला.

Visit to Collector's office in sadad | साद्राबाडीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

साद्राबाडीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Next
ठळक मुद्देनागरिकांशी संवाद : मनोधैर्य राखण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथील भूकंपसदृश घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शनिवारी साद्राबाडीला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी उपविभागीय अधिकारी राहूल कर्डिले, तहसीलदार अजिनाथ गाजरे, अनिल नाडेकर यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांना मनोधैर्य राखण्याचे आवाहन केले. साद्राबाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येईल. तसा प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. शाळेच्या इमारतीच्या कामाचाही त्यात समावेश करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (जीएसआय) या संस्थेच्या साद्राबाडी येथे उपस्थित तज्ज्ञांच्या पथकासोबत जिल्हाधिकाºयांनी चर्चा केली. जीएसआयतर्फे प्राथमिक निरीक्षण अहवाल यावेळी सादर करण्यात आला. यानुसार, छोट्या हादºयांचीही नोंद घेऊ शकतील, अशा तीन यंत्रणा साद्राबाडी, झिल्पी व बोरबान या गावांत बसविण्यात आल्या. विहिरींतील पाण्याच्या पातळीत होणाºया बदलांचेही निरीक्षण घेण्यात आले.

Web Title: Visit to Collector's office in sadad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.