तोंगलाबादला भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 09:55 PM2018-01-30T21:55:57+5:302018-01-30T21:56:16+5:30
तालुक्यातील तोंगलाबाद येथे संत हनुमान महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सव पार पडला.
आॅनलाईन लोकमत
दर्यापूर : तालुक्यातील तोंगलाबाद येथे संत हनुमान महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रा महोत्सव पार पडला. मिरवणुकीत १७ सांप्रदायिक दिंड्यांनी सहभाग घेतला होता.
श्री गजानन महाराज शास्त्री कारलेकर यांच्या वाणीतून सात दिवस श्रीमद् भागवत ग्रंथवाचन झाले. काकडा, आरती , हरिपाठ, हरिकीर्तन व अन्नदान असे धार्मिक कार्यक्रमदेखील झाले. २६ जानेवारी रोजी होमहवन आणि संध्याकाळी ‘हास्यबळी’ हा तुफान विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त नंदकिशोर रायबोले तसेच दिवाळी दरम्यान बोरगाव मंजूजवळ ज्ञानेश्वरी एक्सपे्रसचा अपघात वाचवून सहा हजार लोकांसाठी देवदूत ठरलेले ट्रॅकमन किशोर काळे यांचा सत्कार गावकºयांच्यावतीने करण्यात आला.
संत हनुमान महाराजांची पालखी मिरवणूक २७ जानेवारी रोजी सकाळी गावामधून काढण्यात आली. यादरम्यान विदर्भातून १७ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये प्रथम क्रमांक भाईजी महाराज भजन मंडळ (तराळा) व विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ (बुलडाणा) यांनी प्राप्त केला. सहभागी दिंड्यांना ३५ हजारांचे बक्षिसे देण्यात आली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महोत्सवाची सांगता तुषार महाराज सूर्यवंशी यांच्या सप्तखंजिरी कार्यक्रमाने झाली. मालुजी भजन मंडळ (दर्यापूर), गुरुदेव मंडळ (शिरजदा), गाडगेबाबा भजन मंडळ (भामोद), गुरुदेव मंडळ (विरवारा), कंजरा भजन मंडळ, (जि. वाशीम), पूर्णामाता भजन मंडळ (रामतीर्थ) यांनीही सहभाग घेतला.