वऱ्हाडाच्या मातीतील तज्ज्ञांनी मांडली मते

By admin | Published: January 3, 2016 12:30 AM2016-01-03T00:30:12+5:302016-01-03T00:30:12+5:30

जागतिक मराठी अकादमी, 'शोध मराठी मनाचा' या संमेलनात शनिवारी पार पडलेल्या 'मुक्काम पोस्ट वऱ्हाड' या कार्यक्रमात...

Voorhda soil experts say | वऱ्हाडाच्या मातीतील तज्ज्ञांनी मांडली मते

वऱ्हाडाच्या मातीतील तज्ज्ञांनी मांडली मते

Next

मनोगत : उद्योजक संजय जाधव, शैलेश वानखडे, प्रकाश हेडा यांनी केली चर्चा
संदीप मानकर  अमरावती
जागतिक मराठी अकादमी, 'शोध मराठी मनाचा' या संमेलनात शनिवारी पार पडलेल्या 'मुक्काम पोस्ट वऱ्हाड' या कार्यक्रमात आपापल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त व यशाचे शिखर गाठलेल्या या वऱ्हाडातील विशेषता अंबानगरीच्या मातीतील या नररत्नांनी विविध विषयांवर हात घालत चर्चा केली. या सर्वांना पत्रकार तथा लेखक नितीन केळकर यांनी बोलते केले.
नावलौकिक मिळविलेले तरुण उद्योजक संजय जाधव, तसेच आफ्रिका खंडातील केनिया या देशातील वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सर्जन म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉ. प्रकाश हेडा व उत्कृष्ट उद्योजक तथा बिल्डर शैलेश वानखडे यांनी मिळविलेले यश हे नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे विचार त्यांनी युवकांसमोर मांडला. डॉ.प्रकाश हेडा म्हणाले, तुम्ही प्रत्येक क्षेत्रात काम करताना छोट्या-छोट्या गोष्टींचे निरीक्षण करायला शिकले पाहिजे. त्यातून आत्मविश्वास वाढतो. जीवनात सर्जनता येते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करा व प्रत्येक चांगली गोष्ट जीवनात उतरविली की, जीवनात समाधान मिळते व नंतर यश तुमच्या मागे धावते. हार्डवर्क करा, जोराने पळा पण संध्याकाळी मागे पाहा. मग बघा तुम्हाला कामाचे समाधान लाभते व दुसऱ्या दिवशी जोमाने कामाला लागा.

जीवनात शिस्त कटाक्षाने पाळा
अमरावती : उद्योजक संजय जाधव यांनी या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, तुम्ही ज्या-ज्या क्षेत्रात काम करता त्यामध्ये तुम्ही परफेक्ट असले पाहिजे. कुठलेही काम हे देखाव्यासाठी करू नका. आपली बौद्धिक क्षमता वाढवा, तुमच्या प्रॉडक्टची गुणवत्ता वाढवा, सोच वाढवा. मग बघा यश तुमच्या मागे यश कसे धावते ते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्ट आत्मसात केली तर व ती कलाच तुमच्या जीवनात शिस्त असेल तर शिक्षण कमी असलं तरी चालेल. पण यश हमखास मिळते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच यशस्वी बिल्डर शैलेश वानखडे यांनी युवकांनी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीजकडे वळावे कारण या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहे. काळानुसार त्यांची मागणी आहे. आपल्या वडिलांचे राजकमल चौकातील उड्डाण पूल बांधण्यामध्ये महत्त्वाचे योगदान असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. दूरदर्शन निवेदक, आकाशवाणी केंद्र पुणे प्रमुख पत्रकार नितीन केळकर यांनी आपल्या अभ्यासू शैलीत सर्वांना बोलते करत चर्चा केली.

 

Web Title: Voorhda soil experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.