गण, गटातील पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:13 AM2021-03-14T04:13:20+5:302021-03-14T04:13:20+5:30
अमरावती : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त सदस्यपदांसाठी जिल्हा निवडणूक विभागाने मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध केली. जिल्ह्यात कोरोनाचा ...
अमरावती : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त सदस्यपदांसाठी जिल्हा निवडणूक विभागाने मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध केली. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग असल्याने राज्य निवडणूक आयोगाद्वारा अद्याप पोटनिवडणुकीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना प्रतीक्षा आहे.
विधानसभा सदस्यपदी विजयी होणे, विभागीय आयुक्तांच्या निर्देशाने उमेदवार अनर्ह व सदस्यांचे निधन होणे या कारणांमुळे वरूड तालुक्यातील बेनोडा, दर्यापूर तालुक्यात गायवाडी, धामणगाव रेल्वे तालुक्यात देवगाव जिल्हा परिषद सर्कल व अमरावती तालुक्यात वलगाव व अचलपूर तालुक्यात कांडली पंचायत समिती गणांमध्ये सदस्यपदे रिक्त आहेत. त्यामुळे पोटनिवडणूक घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तीन आठवड्यांपूर्वी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला होता. प्रचलित निकषानुसार मतदार यादी जाहीर झाल्याचे दिवशी आयोगाद्वारा निवडणूक जाहीर केली जाते. मात्र, यावेळी कोरोना संसर्गाने या निकषांना छेद दिल्यामुळे इच्छुकांची उत्सुकता ताणल्या गेली आहे.
बॉक्स
अशी आहे मतदारसंख्या
जिल्हा परिषदेच्या बेनोडा सर्कलमध्ये ४२ मतदान केंद्र, २४,४८४ मतदार, गायवाडी सर्कलमध्ये ५० मतदान केंद्र २८,८०८ मतदार, देवगाव सर्कलमध्ये ४० मतदान केंद्र २२,५२९ मतदार व पंचायत समितीच्या वलगाव गणात १८ मतदान केंद्र व १३,९०५ मतदार तसेच कांडली गणात १८ मतदान केंद्र व १३,७६७ मतदार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाचे प्रमोद देशमुख यांनी दिली.