मतदार यादी होणार ॲक्युरेट! शंभरी पार केलेल्या १६६७ मतदारांची विशेष तपासणी
By जितेंद्र दखने | Published: May 4, 2023 09:55 PM2023-05-04T21:55:43+5:302023-05-04T21:55:54+5:30
ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी निवडणूक विभागाव्दारे मोहीम.
अमरावती: लोकसभा,विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणूकीची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू केली आहे. मतदार यादी अचूक करण्याचा प्रयन्नाचा भाग म्हणून सन २०२३ च्या मतदार यादीत ना असलेल्या ८० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या मतदारांची पडताळणी केली जात आहे.
८ विधानसभा मतदार संघात ४ मे २०२३ च्या माहितीनुसार जिल्हाभरात २३ लाख ८७ हजार ३१५ एवढे मतदार आहेत.यामध्ये शतायुषी असलेल्या मतदारांची संख्या आजघडीला १ हजार ६६७ एवढी आहे.जिल्ह्यात ८ विधानसभा क्षेत्रात २३ लाख ८७ हजार ३१५ मतदार आहेत.यामध्ये वयाची शंभरी ओलाडणाऱ्या मतदारांची संख्या १ हजार ६६७ आहे.या सर्व मतदारांची विशेष तपासणी मोहीम जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात येत आहे.मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने तालुका निवडणूक विभाग आणि विधानसभा निहाय मतदार याद्या तपासण्याचे काम हाती घेतले आहे.
वर्षभरानंतर राज्यात लोकसभा,विधानसभा निवडणूक होणार आहे.या पार्श्वभूृमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहेत.जिल्ह्यात ८० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या ६६ हजार १२४ मतदारांचे निवडणूक कर्मचाऱ्या मार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे.जिल्ह्यात असणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये २३ लाख ८७ हजार ३१५ मतदार आहेत.यामध्ये १२ लाख ३१ हजार १७७ पुरूष,११ लाख ५६ हजार ०५६ महिला आणि ८२ तृृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.जिल्ह्यात ८० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या मतदारांची संख्या ६६ हजार १२४ इतकी असली तरी ज्येष्ठ नागरिक असलेल्या मतदारांची संख्या बरीच मोठी आहे.
वयानुसार मतदार संख्या
८०-८९-६६१२४
९०-९९-१५२२१
१०० प्लस-१६६७
विधानसभा निहाय शंभरी पार मतदार
धामनगाव रेल्वे-१३९
बडनेरा-४२३
अमरावती-३४५
तिवसा-२५१
दर्यापूर-१५४
मेळघाट-१०६
अचलपूर-६९
मोर्शी-१८०
जिल्हा निवडणूक विभागामार्फत बिएलओच्या माध्यमातून ८० वर्षावरील मतदारांची विशेष तपासणी मोहीम सध्या चालू आहे.त्यामध्ये ८० वर्षावरील स्थलातंरीत,किंवा मयत मतदारांची नाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या महिन्याअखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल. श्याम देशमुख, नायब तहसीलदार
निवडणूक विभाग