मतदार याद्या, मतदान केंद्रच निश्चित नाही!

By admin | Published: May 27, 2014 06:33 PM2014-05-27T18:33:06+5:302014-05-27T18:43:49+5:30

शिक्षक मतदार संघ निवडणूक : नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

Voter lists, polling stations are not fixed! | मतदार याद्या, मतदान केंद्रच निश्चित नाही!

मतदार याद्या, मतदान केंद्रच निश्चित नाही!

Next

अकोला : अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघ निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. उमेदवारांना नामनिर्देशनत्र दाखल करण्यासाठी ३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, अद्याप मतदार यादी आणि मतदान केंद्रच निश्चित नाही. त्यामुळे उमेदवारांना अर्ज सादर करताना सूचकांचे नाव व मतदार क्रमांक देताना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक २0 जून रोजी होत आहे. त्यासाठी मंगळवारी अधिसूचना जारी करण्यात आली. अधिसूचना जारी केली असली तरी मंगळवारी सायंकाळपर्यंत अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या पाचही जिल्‘ातील मतदारांच्या याद्याच अंतिम झालेल्या नव्हत्या. मतदार याद्या अंतिम नसल्याने अद्याप मतदान केंद्रही निश्चित होऊ शकले नाही. मतदार याद्या आणि मतदान केंद्रच तयार नसल्याने उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. जुन्या यादीनुसार उमेदवारांनी अर्जावर सूचकांचे नाव टाकल्यास ते नवीन यादीनुसार चुकीचे ठरून अर्ज बाद होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांची घालमेल सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
**  काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणाच नाही!
शिक्षक मतदार संघात काँग्रेसने कोणत्याही संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा न देता यावेळी थेट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप पक्षाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणाच झाली नाही. अकोला जिल्‘ातील माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांचे पुत्र प्रकाश तायडे यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप त्यांच्या नावाची घोषणाच न झाल्याने काँग्रेसच्या शिक्षक सेलचे सदस्य संभ्रमात पडले आहेत.

Web Title: Voter lists, polling stations are not fixed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.