महिला मेळाव्यात मतदान जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:51 PM2019-03-23T22:51:26+5:302019-03-23T22:51:44+5:30
निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असून, महिलांनीही या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असून, महिलांनीही या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी केले.
स्वीप मोहिमेंतर्गत महिला मतदार जागृतीसाठी नेहरू युवा केंद्राच्या सहकार्याने येथील एस.व्ही. देशमुख स्मृती सभागृहात नुकताच महिला मेळावा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. स्त्रीरोगतज्ज्ञ अलका कुथे, डीआरडीचे चेतन जाधव, नेहरू युवा केंद्राच्या समन्वयक ज्योती मोहिते आदी उपस्थित होते.
देशाचा एक नागरिक म्हणून मतदानाचे पवित्र कार्य पार पाडणे ही सर्वांची जबाबदारी आहे. महिलांनी सुद्धा या कार्यात सक्रिय व्हावे, असे आवाहन मनीषा खत्री यांनी केले. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्याची शपथ यावेळी सर्व महिलांनी घेतली. यावेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटव्दारे मतदानाचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. झेडपीचे संजय खारकर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.