मतदान, मतमोजणीची प्रक्रियाच क्लिस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:23 AM2020-12-03T04:23:01+5:302020-12-03T04:23:01+5:30

अमतावती : लोकशाही मजबूत होण्यासाठी मतदाराने प्रत्यक्ष मतदान करणे महत्त्वाचे आहे. विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी झालेली मतदानाची प्रक्रिया व ...

Voting, counting process is a clich | मतदान, मतमोजणीची प्रक्रियाच क्लिस्ट

मतदान, मतमोजणीची प्रक्रियाच क्लिस्ट

Next

अमतावती : लोकशाही मजबूत होण्यासाठी मतदाराने प्रत्यक्ष मतदान करणे महत्त्वाचे आहे. विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी झालेली मतदानाची प्रक्रिया व गुरुवारची मतमोजणी ही एकप्रकारे क्लिस्ट अन् वेळकाढूपणाची असल्याचा मतदारांचा सूर आहे. येथील गर्ल्स हायस्कूल चौकातील मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत तीन तासांवर तिष्ठत उभे राहावे लागल्याने मतदारांनी ही भावना व्यक्त केली.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात १०,३८६ मतदार असताना फक्त २५ मतदान केंद्र होती. यापैकी काही केंद्रांवर अधिक मतदारसंख्या असल्याने तेथे मतदारांना तीन ते चार तास मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. यावेळची निवडणूक ही कोरोना संसर्गाचे सावट व या अनुषंगाने प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना यामध्ये पार पडली. त्यामुळे मतदाराची सर्वप्रथमच एकप्रकारे प्राथमिक आरोग्य तपासणी झाल्याशिवाय त्यांना केंद्रात प्रवेश नव्हता. त्यानंतर २७ उमेदवारांची मतपत्रिका व यामध्ये उमेदवाराचा पसंतीक्रम लिहिणे व यासाठी त्या उमेदवाराचे नाव शोधण्यात बराच वेळ जात असल्याने अनेक मतदारांनी पुर्ण पसंतीक्रम न लिहिता, काही रकाण्यात नोंदी केल्या. यात वेळ जात आहे व अन्य मतदार प्रतीक्षेत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांनी आटोपते घेतले. यामध्ये बराचसा वेळ गेल्याने काही मतदार केंद्रांवर रांगा लागल्या होत्या व मतदानाची वेळ संपल्यानंतरही तासभर मतदान सुरू होते. एकूण या मतदान प्रक्रियेत सुटसुटीत असा बदल आयोगाने करावा, असेही मत काही मतदारांनी बोलून दाखविले.

बॉक्स

एकेका मतदाराला लागलीत तीन ते पाच मिनीटे

मतदान केंद्रावरील रांगेतील दोन तासांवर प्रतीक्षा, त्यानंतर आरोग्य तपासणी, मतदाराची ओळख, मतदारयादीतील नाव, नंतर सही, मतदान अधिकाऱ्याद्वारा मतपत्रिकेची घडी, त्यानंतर त्यांनी पुरविलेल्या पेनद्वारे मतपत्रिकेवरील २७ उमेदवारांपौकी पसंतीचा उमेदवार शोधून क्रम लिहीने व यामध्ये वेळ जात असल्याचे लक्षात आल्याने पसंतीक्रम अध्यार्तच आटोपून, पुन्हा मतपत्रिकेची घडी करुन मतदानाचे पेटीत टाकणे, ही प्रक्रीया वेळकाढूपणाची असल्याने यामध्ये किमान तीन ते पाच मिनीटांचा अवधी गेला व मतदान केंद्रांवर रांगा वाढल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

मतमोजणीसाठी २४ ते ३० तास लागणार

(कृपया बॉक्ससाठी जागा सोडावी)

Web Title: Voting, counting process is a clich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.