चारही जागांसाठी मतदान अनिवार्य

By admin | Published: January 28, 2017 12:26 AM2017-01-28T00:26:46+5:302017-01-28T00:26:46+5:30

प्रत्येक मतदाराला प्रभाग क्र. ९ चा अपवाद वगळता सर्व प्रभागात चार उमेदवार निवडून द्यावयाचे असून त्यांना मतदान करणे अनिवार्य आहे.

Voting mandatory for all four seats | चारही जागांसाठी मतदान अनिवार्य

चारही जागांसाठी मतदान अनिवार्य

Next

आयुक्त : १९ फेब्रुवारीला जाहीर प्रचारावर लगाम
अमरावती : प्रत्येक मतदाराला प्रभाग क्र. ९ चा अपवाद वगळता सर्व प्रभागात चार उमेदवार निवडून द्यावयाचे असून त्यांना मतदान करणे अनिवार्य आहे. केवळ प्रभाग क्र. ९ मध्येच मतदारांना तीन मते द्यावे लागतील, रविवारी नामनिर्देशन स्वीकारणे सुरू राहणार असल्याची माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी शुक्रवारी दिली.२१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडङणुकीसंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांसोबत शपथपत्रातील गोषवारा मतदान केंद्राबाहेर फ्लेक्सच्या स्वरूपात लावण्यात येणार आहे. उमेदवाराला त्याच्या घरी शौचालय असल्याचे व त्याचा वापर करीत असल्याचे लेखी पत्र द्यावे लागेल. प्रथमच जिल्हा स्टेडियम येथील क्रीडा संकुलात प्रभागनिहाय मतमोजणी होणार आहे.२३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात होईल,असे ते म्हणाले.नामनिर्देशन फॉर्म आॅनलाईन पद्धतीने सायबर कॅफेमध्ये भरता येणार असून नामनिर्देशनाचे एबी फॉर्म ३ फेबु्रवारीपर्यंतच दाखल करता येतील. मतदानाकरीता एकूण ७३८ मतदान केंद्र राहणार आहेत. एका मतदान केंद्रावर अधिकाधिक ८०० मतदार राहतील. मतदाराने नाव शोधणे, मतदानकेंद्र शोधण्याकरिता ‘ट्रू वोटर अ‍ॅप’चा वापर करावा, असे यावेळी आयुक्तांनी सांगितले.अनामत रक्कम सर्वसाधारण उमेदवाराकरिता ५ हजार रूपये तर ओबीसी, एससी, एसटी, महिलांकरिता २५०० रूपये राहिल, तक्रार निवारणकक्ष व आचारसंहिता नियंत्रण पथके सुद्धा स्थापन करण्यात आली आहेत. जाहीर प्रचार १९ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता बंद होईल. अनामत रक्कम पावती झेरॉक्स, आरक्षित जागेसाठी जातप्रमाणपत्र, वैधताप्रमाणपत्र नसल्यास ते मिळण्याकरिता प्रकरण सादर केल्याची पोहोच व निवडून आल्यास ६ महिन्यांच्या आता वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, उमेदवाराचा मतदानकेंद्र प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी गुन्हेगारी पार्श्वभूमिचा नसावा, उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दैनिक खर्च विहित नमुन्यात दुसऱ्या दिवशी २.०० वाजेपर्यंत सादर करावा, निकालानंतर निवडणुकीचा संपूर्ण खर्च ३० दिवसाच सादर करावा लागेल. राष्ट्रीय कक्ष, राज्यस्तरील पक्ष ४० स्टार प्रचारकांची नियुक्ती करू शकतात,अशी माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी दिली.

Web Title: Voting mandatory for all four seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.