चिखलदरा बांधकाम विभागातील व्हीव्हीआयपी विश्रामगृह हाउसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:15 AM2021-08-22T04:15:46+5:302021-08-22T04:15:46+5:30
पहिल्यांदा फलक लागले: लोकमत झळकला फोटो कॅप्शन विश्रामगृहावर पहिल्यांदा आरक्षण हाऊसफुल असल्याचे असे फलक लागले) चिखलदरा : चिखलदरा पर्यटन ...
पहिल्यांदा फलक लागले: लोकमत झळकला
फोटो कॅप्शन विश्रामगृहावर पहिल्यांदा आरक्षण हाऊसफुल असल्याचे असे फलक लागले)
चिखलदरा : चिखलदरा पर्यटन स्थळावर हजारोंच्या संख्येने दररोज पर्यटक भेटी देत असतांनाच येथील खाजगी हॉटेल मधील खोल्यांचे आरक्षण केल्या जाते परंतु पहिल्यांदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या व्हीव्हीआयपी विश्रामगृहाचे आरक्षण फुल्ल झाल्याचे फलक लावण्यात आले आहे
विदर्भाच्या नंदनवनात येणाऱ्या पर्यटकांसह राजकीय व प्रशासकीय मंत्रालयीन अधिकाऱ्यांची सर्वाधिक धाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुसज्ज अशा व्हीव्हीआयपी विश्रामगृहावर असते अगदी बोटावर मोजक्या सहा खोल्यांसाठी आगाऊ आरक्षण केले तरी शासकीय नियमाच्या प्रोटोकॉल नुसार खोल्यांचे आरक्षण केल्या जाते परंतु विश्रामगृहाच्या इतिहासात पहिल्यांदा चार दिवसापूर्वीच हाउसफुल असल्याचे फलक सार्वजनिक बांधकाम विभागाला लावावे लागले आहे
बॉक्स
हजारो पर्यटक, दिलखेच नजारा
शनिवार रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी मध्ये मोठ्या प्रमाणात चिखलदरा पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मांदियाळी आहे लॉक डाऊन नंतर मात्र दररोज हजारोंच्या संख्येने पावसात भिजण्यासह,पांढर्शुभ्र धुक्यात विलोभनीय दृश्य नंदनवनाचे आहे हजारोच्या संख्येने दरोज पर्यटक भेट देतात
बॉक्स
लोकमत झळकला
शासकीय विश्रामगृहाच्या सूचनाफलकावर पुढील चार दिवसाचे आरक्षण हाउसफुल असल्याचे फलक लावण्यात आले असून त्यावर विश्रामगृहात च्या आवारात वाघोबाचे दर्शन झाल्याचे वृत्त लोकमत ने प्रकाशित केले होते ते वृत्त सुद्धा या फलकावर लावण्यात आले आहे
कोट
विश्रामगृहाच्या मोजक्याच खोल्या आहेत. प्रोटॉकल नुसार आरक्षण दिले जाते पुढील चार दिवसाचे आरक्षण पूर्ण झाल्याने विश्रामगृह परिसरात हाऊसफुल असे फलक लावण्यात आले आहे
- मिलिंद पाटणकर, उपविभागीय अभियंता
सा बां विभाग चिखलदरा