वडा-सांबरात निघाला मुंगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:17 PM2018-08-10T22:17:35+5:302018-08-10T22:18:07+5:30
विद्यार्थी व शिक्षकांसाठी असलेल्या विद्यापीठ परिसरातील उपाहारगृहामध्ये सतत अस्वच्छता व भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होत असल्याची तक्रार युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न प्रशासन विभागाकडे केली आहे. या कँटीनची तपासणी करण्यात आली तेव्हा एका विद्यार्थ्याच्या वडासांभारमध्ये चक्क मुंगळा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून, यासंदर्भाची तक्रारसुद्धा देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यार्थी व शिक्षकांसाठी असलेल्या विद्यापीठ परिसरातील उपाहारगृहामध्ये सतत अस्वच्छता व भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होत असल्याची तक्रार युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न प्रशासन विभागाकडे केली आहे. या कँटीनची तपासणी करण्यात आली तेव्हा एका विद्यार्थ्याच्या वडासांभारमध्ये चक्क मुंगळा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून, यासंदर्भाची तक्रारसुद्धा देण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या कुठल्याही नियमांचे पालन केले जात नाही. कँटीनचालकांच्यावतीने या ठिकाणी गैरसौय करण्यात येत आहे. कँटीनच्या स्वयंपाकघरात व परिसरात अस्वच्छतेचा अभाव असल्याने या ठिकाणी प्रचंड अडचणी निर्माण होत असून, अन्नपदार्थात मुंगळा निघाल्याने विद्यार्थ्यांच्या तब्येत खालावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युवा सेना शहरप्रमुख वैभव मोहोकार, उपशहरप्रमुख प्रणय डांगे यांनी एफडीए अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आणि कँटीनचालकावर कारवाईची मागणी करण्यात आली.