वडाळी-चांदूर रेल्वे परिक्षेत्र वनाच्छादित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:11 AM2021-02-08T04:11:57+5:302021-02-08T04:11:57+5:30
३३ कोटी वृक्षारोपण, १५ फुटांची झाडे, परिश्रमाचे झाले चीज अमोल कोहळे पोहरा बंदी : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील ३३ कोटी ...
३३ कोटी वृक्षारोपण, १५ फुटांची झाडे, परिश्रमाचे झाले चीज
अमोल कोहळे
पोहरा बंदी : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील ३३ कोटी वृक्ष लागवत यशस्वी ठरल्याचे वनाच्छादित झाले आहे. गतवर्षी राबविलेल्या उपक्रमातील मिश्र प्रजातीचे रोपवनातील झाडे १५ फुटांची झाली आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत विपुल प्रमाणात न आढळलेल्या झाडांच्या प्रजाती या रोपवानात बहरत आहेत.
करंज, पापडा, सिसम, आवळा, मायरुक, चिंच, इंगिल चिंच, गोरक, चिच, सिरस, बिहाळ, जांभुळ, अमलतास, बेल, कवट, खैथर, कांचन, निंब, सुस, साग, पिंपळ, वड, बांबू या प्रजातीची झाडे वडाळी-चांदूर रेल्वे परिक्षेत्रातील रोपवनात डोलत आहेत. वडाळी वनपरिक्षेत्रातील बडनेरा, वडाळी, पोहरा, भातकुली तसेच चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील चांदूर रेल्वे, चिरोडी, माळेगाव या वर्तुळाच्या वनक्षेत्रात लागवड झाली असून, पुढील वर्षी या जंगलात दिवसाही भय वाटावे एवढी झाडांची घनदाट बंदी राहील, अशी येथील स्थिती आहे.
वन्यप्राण्यांकडून रोपवनाची होणारी धूळधाण रोखण्यासाठी वनरक्षक, वनमजूर दक्ष आहेत. वनविभागाने यासाठी चेन फेंसिंगची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे. ३३ कोटी वृक्षलागवडीतून उभे करण्यात आलेले हे जंगल अमरावती शहराभोवतालची वनसंपदा समृद्ध करित आहे.