भाजपच्या दणक्यानंतर सूर्यलक्ष्मीच्या कामगारांची वेतनवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:11+5:302021-07-11T04:11:11+5:30
नांदगाव पेठ : पंचतारांकित एमआयडीसीत असलेल्या सूर्यलक्ष्मी कंपनीत सहा वर्षांपासून कामगारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने १ जुलै रोजी भाजप ...
नांदगाव पेठ : पंचतारांकित एमआयडीसीत असलेल्या सूर्यलक्ष्मी कंपनीत सहा वर्षांपासून कामगारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने १ जुलै रोजी भाजप कामगार आघाडीच्यावतीने कामगारांसह कंपनीत ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी व्यवस्थापनाने सात दिवसांचा अवधी मागितला होता. त्याअनुषंगाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत कामगारांना दरमहा एक हजार रुपये वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला. भाजप कामगार आघाडीच्या दणक्यानंतर कामगारांना न्याय मिळाल्याने कामगारांनी यावेळी पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
केवळ २२० रुपये प्रतिदिवस कामगारांना वेतन देण्यात येत असून, कामगारांना इतर कुठल्याही सुविधा पुरविण्यात येत नसल्याने कामगारांनी अनेकदा व्यवस्थापनाविरोधात आवाज उचलला. मात्र, व्यवस्थापनाकडून कामावरून कमी करण्याची धमकी मिळत असल्याने काही कामगारांनी भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सत्यजित राठोड व भाजप तालुकाध्यक्ष राजू चिरडे यांच्याकडे व्यथा मांडली.
भाजपने कामगारांसह १ जुलै रोजी सूर्यलक्ष्मी कंपनीत ठिय्या आंदोलन केल्यानंतर व्यवस्थापनाने सात दिवसांचा अवधी मागितला होता. बैठकीत व्यवस्थापनाने दरमहा एक हजार रुपये वेतनवाढीचा निर्णय घेतला असून, काही सुविधादेखील पुरविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. या बैठकीत कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सत्यजित राठोड, राजू चिरडे, लक्ष्मण शिंगणजुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
100721\img-20210701-wa0021.jpg
व्यवस्थापनाशी चर्चा करतांना भाजप पदाधिकारी