मेळघाटच्या प्रवेशद्वारावर वाघोबाचे होणार दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:48 PM2018-07-29T22:48:47+5:302018-07-29T22:49:15+5:30

मेळघाटच्या पायथ्याशी परतवाडा प्रवेशद्वारावर पर्यटकांसह वनप्रेमींचे स्वागत आता जंगलाचा राजा वाघ करणार आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून जंगलाचा राजा असलेल्या वाघाच्या पूर्णाकृती प्रतिकृतीचे उद्घाटन रविवारी सकाळी ११ वाजता खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले.

Waghoba will be seen at Melghat's entrance | मेळघाटच्या प्रवेशद्वारावर वाघोबाचे होणार दर्शन

मेळघाटच्या प्रवेशद्वारावर वाघोबाचे होणार दर्शन

Next
ठळक मुद्देजागतिक व्याघ्रदिनी लोकार्पण : परतवाड्यात वाघोबाची सेल्फी घेता येईल
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाटच्या पायथ्याशी परतवाडा प्रवेशद्वारावर पर्यटकांसह वनप्रेमींचे स्वागत आता जंगलाचा राजा वाघ करणार आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून जंगलाचा राजा असलेल्या वाघाच्या पूर्णाकृती प्रतिकृतीचे उद्घाटन रविवारी सकाळी ११ वाजता खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी, मेळघाटचे आ. प्रभूदास भिलावेकर अचलपूरच्या नगराध्यक्ष सुनीता फिसके, उपवनसंरक्षक जी.आर. माधवराव, विनोद शिवकुमार, विशाल माळी, सहायक वनसंरक्षक मिलिंद तोरो, शिवसेनेच्या भावना कोंडे, पोपट घोडेराव, ओमप्रकाश दीक्षित, सरीता आहाके, सागर वाटाणे, वर्षा भोयर सह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मेळघाटात हा संपूर्ण जंगलाने व्यापलेला परिसर असून त्याला भेट देण्यासाठी देशभरातील लाखो पर्यटक मेळघाटात येतात. मेळघाटात प्रवेश करतानाच आता मेळघाटची ओळख असलेल्या वाघोबाकडून त्यांचे स्वागत होणार आहे. खासदार अडसूळ यांच्या विशेष प्रयत्नाने वाघाचा पूर्णाकृती प्रतिकृती बसविण्यात आले आहे. पर्यावरणाच्या अन्नसाखळीत वाघ जंगलाचा राजा असला तरी तो महत्त्वपूर्ण घटक आहे. वाघ असेल तर जंगल वाचेल. वाघाच्या सुरक्षतेसाठी देशात मोठ्या प्रमाणात योजना आखल्या जात आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येत्या काही वर्षांत वाघांची संख्या वाढल्याचे आनंददायी वृत्त आहे जागतिक व्याघ्रदिनी परतवाडा शहराच्या धारणी, चिखलदरा या मेळघाट परिसराकडे जाणाऱ्या टी पॉर्इंटवर वाघोबा उतरल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

सेल्फीचा नाद पूर्ण होणार
जंगलात वाघ दिसताच अनेकांची त्रेधातिरपट होते. मात्र, आता परतवाडा शहरात वाघोबाचे दर्शन झाल्याने सेल्फीचा नाद असलेल्यांची मनोकामना पूर्ण होणार आहे. वाघोबाचा पूर्णाकृती पुतळा आकर्षक असल्याने पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांच्या वाघासोबत फोटो असण्याच्या इच्छा-आकांक्षा सेल्फीचा नाद पाहता तो पूर्ण होणार आहे.

Web Title: Waghoba will be seen at Melghat's entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.