पणनच्या केंद्रांना कापसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:41 PM2017-10-29T22:41:09+5:302017-10-29T22:41:39+5:30

जिल्ह्यात २५ आॅक्टोबरपासून पणन महासंघाची पाच केंदे्र सुरू करण्यात आली; मात्र उद्घाटनापासून कापसाचा टिपूसही आलेला नाही.

Waiting for cotton for the marketing centers | पणनच्या केंद्रांना कापसाची प्रतीक्षा

पणनच्या केंद्रांना कापसाची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देशेतकºयांची पाठ : खुल्या बाजारात अधिक भाव

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात २५ आॅक्टोबरपासून पणन महासंघाची पाच केंदे्र सुरू करण्यात आली; मात्र उद्घाटनापासून कापसाचा टिपूसही आलेला नाही. खुल्या बाजारात आधारभूत किमतीपेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकºयांनी या केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.
यंदा अमरावती, अचलपूर, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी ही केंद्रे बुधवारपासून सुरू झाली. मात्र, या केंद्रांवर आतापर्यंतची खरेदी निरंक आहे. यंदाच्या हंगामात सीसीआयद्वारा कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. पणनला स्वतंत्रपणे कापूस खरेदीची परवानगी शासनाने नाकारली. मात्र, सीसीआयची अभिकर्ता म्हणूून कापूस खरेदीची परवानगी दिली. याविषयीचा करारनामादेखील मंगळवारी झाला. बुधवारपासून पणन महासंघाने जिल्ह्यातील चार केंद्रांवर कापूस खरेदीचा शुभारंभ केला; मात्र शेतकरी खुल्या बाजारात अधिकचा भाव मिळत असल्याने तिकडे वळला आहे. त्यामुळे शासनाला शेतकºयांना संरक्षण द्यायचे झाल्यास आधारभूत किमतीमध्ये उत्पादनखर्च अधिक ५० टक्के नफा द्यावा लागेल तसेच गुजरातच्या धर्तीवर प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस द्यावा लागेल, अन्यथा शेतकºयांचा कापूस खरेदी करून व्यापारी तो गुजरातमध्ये विकतील.
मागील वर्षीदेखील व्यापाºयांनी हाच फंडा वापरून जिल्ह्यातून खरेदी करून बहुतांश कापूस गुजरातमध्ये विकला होता. यंदा पाऊस नसल्याने कपाशीची पेरणी उशिरा सुरू झाली. त्यामुळे वेचणीलादेखील वेळ लागत आहे आदी कारण देत पणनच्या केंद्रांकडून कापसाची प्रतीक्षा केली जात आहे. पणनने कापूस खरेदी केंद्र सुरू केले असले तरी शेतकºयांनी या केंद्रांकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. शासनाच्या जाचक अटींमुळे बहुतांश कापूस उत्पादक विक्रीसाठी खासगी केंद्राकडेच वळत आहेत. पणन अथवा बाजार समितीत शेतकºयांना कापूस विक्री करताना आधार नोंदणी अनिवार्य केल्यामुळे या भानगडीतून सुटका करण्यासाठी हा निर्णय घेतला.
कापूस खरेदीसाठी आॅनलाईनची भानगड
पणन केंद्रांवर कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकºयांना बाजार समितीमध्ये आॅनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी शेतकºयांना सातबारा, बँक खातेक्रमांकासह आधार क्रमांकही द्यावा लागणार आहे. केंद्रांवर मिळणारा कमी भाव, आॅनलाइन नोंदणी आणि दोन आठवड्यांनी मिळणारे पेमेंट याचा परिणाम केंद्रांवरील कापूस विक्रीवर होणार आहे.
असा आहे कापसाचा हमीभाव
यंदाच्या हंगामात कापसाच्या वाणानुसार हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. बन्नी- ब्रम्ह या जातीला ४ हजार २२०, एच ४, एच ६ ला ४ हजार २२० एलआरए- ५१६६ या जातीला ४ हजार १२० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. उत्पादनखर्च वाढला असल्याने हमीभावात शेतकºयांना नुकसानच सहन करावे लागत आहे.
गुजरातमध्ये बोनस; राज्यात केव्हा ?
गुजरात राज्याने कापूस उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील कापूस गुजरातमध्ये जात आहे. अशीच स्थिती राहिल्यास राज्यातील कापूस व कापड उद्योगांवर संक्रांत येईल. त्यामुळे राज्यात गेल्या तीन वर्षांपासून आश्वासनांवर झुलणाºया कापूस उत्पादकांना बोनस द्यावा, अशी मागणी आहे.

Web Title: Waiting for cotton for the marketing centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.