श्रीक्षेत्र रिद्धपुरात व्यापारी संकुलातील गाळे वितरणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:30+5:302021-02-11T04:14:30+5:30
रिद्धपूर : तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत राजमठ मंदिर परिसरातील तळेगावकर मठ ट्रस्टच्यावतीने ग्रामपंचायत प्रशासनाला जागा देऊन, तेथे एक वर्षापूर्वी ...
रिद्धपूर : तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत राजमठ मंदिर परिसरातील तळेगावकर मठ ट्रस्टच्यावतीने ग्रामपंचायत प्रशासनाला जागा देऊन, तेथे एक वर्षापूर्वी व्यापारी संकुल बांधण्यात आले. त्यातील गाळे वितरण करून नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे.
२० लाख रुपयांतून पाच व्यापारी गाळे मंजूर झाले होते. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेकड़े जागा उपलब्ध नसल्यामुळे अमरावती जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत भास्कर दादा तलेगावकर यांनी ट्रस्टची जागा दिली. तेथे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, राजमठ मंदिरापुढील पूजा साहित्य विक्रीच्या दुकानांनी मंदिर परिसर व्यापला गेल्याने मंदिराचे सौंदर्य बाधित झाले आहे. यामुळे
सर्वप्रथम येथील विक्रेत्यांना हे गाळे देण्यात यावे, असे निर्देशित करण्यात आले. त्याला अनुसरून ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव झाला व ट्रस्टच्या जागेत गाळे आकारास आले. परंतु, अजूनपर्यंत राजमठ मंदिर परिसरातील पूजा साहित्य विक्री दुकानदार हे शाॅपिंग सेंटरमध्ये स्थलांतरित होण्यास तयार नसल्यामुळे वितरण रखडले आहे.
-----------
दहा दिवसांत इतरांना हस्तांतरण
ग्रामपंचायत प्रशासनाने ही दुकाने ज्या ट्रस्टकड़े हस्तांतरित केली, त्या ट्रस्टचे अध्यक्ष महंत तलेगावकर बाबा यांनी मंदिरासमोरील दुकानदारांना ग्रामपंचायत प्रशासनाने व्यापारी संकुलात जाण्यास तयार नसलेल्या दुकानदारांना ग्रामपंचायत प्रशासनाने नोटिस दिल्याचे सांगितले. १० दिवसांत त्या शाॅपिंग सेंटर दुकानात गेले नाही, तर गावातील नागरिकांना वितरण करण्यात येईल, असे तलेगावकर मठ ट्रस्टच्या अध्यक्षांनी सांगितले.