पीएचडी पेट परीक्षार्थ्यांची कधी संपणार प्रतीक्षा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:38 PM2017-11-26T23:38:13+5:302017-11-26T23:38:28+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पीएचडी पेट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज सादर करण्यास बराच कालावधी झाला असताना अद्यापही पीएचड पेट परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने ...

Waiting to finish PhD stomach examinations ever? | पीएचडी पेट परीक्षार्थ्यांची कधी संपणार प्रतीक्षा ?

पीएचडी पेट परीक्षार्थ्यांची कधी संपणार प्रतीक्षा ?

Next
ठळक मुद्देतारीख जाहीर नाहीच : विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पीएचडी पेट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज सादर करण्यास बराच कालावधी झाला असताना अद्यापही पीएचड पेट परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा कधी संपणार, असा सवाल आता परीक्षार्थी करू लागले आहे.
गत दोन वर्षांपासून तांत्रिक अडचणींमुळे पीएचडी पेट परीक्षा गत दोन वर्षांपासून घेण्यात आली नाही. मात्र, आता नवसंशोधकांसाठी पीएचडी पेट परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. त्याअनुषंगाने परीक्षेकरिता आॅनलाईन अर्ज, शुल्क आदी बाबी पूर्ण करण्यात आल्यात. परंतु आॅनलाईन अर्ज सादर केल्यानंतरही परीक्षेची तारीख, केंद्र अजुनही निश्चित झाले नाही.
केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संशोधनासाठी पीएचडी पेट परीक्षा आणि कोर्स वर्क पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यानुसार विद्यापीठाने नेमलेल्या टीसीएस यंत्रणेकडे ६ हजार ७१८ विद्यार्थ्यांनी पीएचडी पेट परीक्षेसाठी अर्ज सादर केले आहे. परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज अपलोड करण्यास अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. पीएचडी पेट परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नसल्याने नवसंशोधकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आज, उद्या कधी तारीख जाहीर होणार, याकडे पीएचडी पेट परीक्षार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
तांत्रिक अडचणींचा उमेदवारांना फटका
हल्ली पीएचडी पेट परीक्षेसाठी आॅनलाईन ६ हजार ७१८ अर्ज तांत्रिकदृष्ट्या पूर्ण झाले आहे. तसेच १३३२ अर्ज हे नवसंशोधकांनी सादर केले असले तरी ते पूर्ण झाले नव्हते. आॅनलाईन अर्ज सादर इतकीच प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे पेट समितीने हे सर्व अर्ज नाकारले आहेत. चार उमेदवारांचे अर्ज हे सादर करण्यात आले पण, क्षुल्लक कारणांमुळे ते अपलोड होऊ शकले नाही.

Web Title: Waiting to finish PhD stomach examinations ever?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.