चार हजार शेतकरी प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:13 PM2018-04-05T22:13:51+5:302018-04-05T22:13:51+5:30
राज्य सरकारने शेतकऱ्याची तूर शासकीय दराने खरेदी करण्यासाठी नाफेडची मुख्य एजंट म्हणून नियुक्ती केली. खरेदी-विक्री संघाचे सब एजंट म्हणून नियुक्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूररेल्वे : राज्य सरकारने शेतकऱ्याची तूर शासकीय दराने खरेदी करण्यासाठी नाफेडची मुख्य एजंट म्हणून नियुक्ती केली. खरेदी-विक्री संघाचे सब एजंट म्हणून नियुक्त आहे. या केंद्रावर ५ एप्रिलपर्यंत १६०० शेतकऱ्यांकडून २६४८५ क्विंटल तुरीची खरेदी झाली. आतापर्यंत ४०२९ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. तूर खरेदीच्या मंद गतीमुळे निम्मे शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
बाजार भावात तुरीचे दर चार हजार प्रतिक्विंटलपेक्षा कमी आहेत. शासकीय दराने शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी धडपड सुरू आहेत. शेकडो शेतकरी दररोज येऊन नोंदणीचे मॅसेज कधी येतील, याची प्रतीक्षा यादीबाबत चौकशी करतात.
चांदूररेल्वे खरेदी-विक्री संघाचे सर्वच कर्मचारी सेवानिवृत्त होऊन फक्त सुरेश ढाकूलकर कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या गर्दीचा ओघ लक्षात घेता, चांदूर रेल्वे खरेदी-विक्री संघाने सर्व व्यवहार पाहता नाफेडद्वारे खरेदी-विक्री संघाचे आजपर्यंत ठरलेल्या कमिशनचा एकही रुपया प्राप्त झाला नाही. कर्मचारी सध्या विनावेतन कर्तव्य बजावत बाजार समितीत मोजमाप करीत वजन करण्यासाठी ठरावीक चार काटे चालवित आहेत. याबाबत नाफेड, खरेदी-विक्री, बाजार समिती व सहायक निबंधकाने संयुक्त बैठक घेवून निधार्रीत तारखेपूर्वी शेतकºयाचे तुरीचे मोजमाप करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी शेतकºयांची चर्चा सुरू आहे.
खरेदी-विक्री संघाला व चांदूर रेल्वे कृषिउत्पन्न बाजार समितीला वजनकाटे व चाळण्या वाढविण्यासाठी २१ मार्चला लेखी पत्र दिले. कोणत्याही परिस्थितीत नोंदणी केलेल्या शेतकºयाची तूर मोजणे आवश्यक आहे. तशा सूचना वरिष्ठांकडून आहे.
- बी. एस. पारिसे, सहायक निबंधक