तीन हजार कुटुंबांना घरकुलांची प्रतीक्षा
By admin | Published: April 22, 2016 01:34 AM2016-04-22T01:34:38+5:302016-04-22T01:34:38+5:30
घरकुलाचे स्वप्न पाहणारे तालुक्यातील तीन हजार कुटुंब हक्काच्या निवाऱ्यासाठी भटकंती करीत आहेत़ तालुक्याच्या प्रतीक्षा
मोहन राऊत ल्ल धामणगाव रेल्वे
घरकुलाचे स्वप्न पाहणारे तालुक्यातील तीन हजार कुटुंब हक्काच्या निवाऱ्यासाठी भटकंती करीत आहेत़ तालुक्याच्या प्रतीक्षा यादीच्या तुलनेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून मिळणाऱ्या घरकुलांची संख्या नाममात्र आहे. अनेक कुटुंबांना घरकुल मंजूर झालेत. मात्र, जागा उपलब्ध करून देण्याकरिता तोडगा काढण्याऐवजी महसूल प्रशासन कागदी घोडे नाचवित असल्याने या कुटूंबांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे़
तालुक्यात इंदिरा आवास घरकूल योजनेची अवस्था बिकट आहे़ जिल्हा प्रशासनाकडून प्रतीक्षा यादीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे इतर मागासवर्गीय गटातील १ हजार ४४ कुटुंबांना हक्काचे घरकूल मिळाले नाही जळगाव आर्वी येथील २० कुटुंबांना आजही प्रतीक्षा करावी लागत आहे़ येथील सरपंच सोनाली धीरज मुडे यांनी ग्रामीण विकास यंत्रणेकडे पत्रव्यवहार करून या उपेक्षित लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे़ सावळा येथील ३० लाभार्थ्यांना घरकूल मिळावे म्हणून बाजार समितीचे संचालक अविन टेकाडे मैदानात उतरले असून वडगाव राजदी गावातील उपसरपंच नितीन काळे यांनी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे़ त्याचप्रमाणे रायपूर कासारखेड जुळ्या गावातील ३७ जणांना न्याय मिळावा म्हणून येथील सरपंच कीर्ती राऊत न्याय मागत आहेत. सोनेगाव खर्डा येथील सरपंच प्रवीण खैरकार यांनी ५० घरकुल प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना मिळावे म्हणून ग्रामीण विकासयंत्रणेच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे़ जळगाव मंगरूळ येथील २६ लाभार्थांना थेट जिल्हा प्रशासनाच्या दरबारात नेऊन उपसरपंच मनोज शिवणकर यांनी त्यांना हक्काचे घरकुल कधी देणार? असा सवाल प्रशासनाला विचारला आहेत़ गव्हा फरकाडे येथील सरपंच दुर्याेधन राघोर्ते यांनी ३६ लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी हक्काची लढाई लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे़ तळेगाव दशासर येथील सरपंच मनोज बानोडे यांनी ७४ लोकांना न्याय मिळावा म्हणून प्रशासनाला निवेदन दिले आहे़
वाढोणा येथील सरपंच महानंदा तितरे व चिंचोली येथील सरपंच तुषार सोरटकर यांनी त्यांच्या गावातील ओबीसी यादीतील घरकुलांचे लाभार्थी बिकट जीवन जगत असल्याचा पुरावा जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे़ मंगरूळ दस्तगीर येथील ६९ लाभार्थ्यांसाठी सरपंच अर्चना भोंगे उसळगव्हाणचे सरपंच नितीन कोेंडेकार, देवगाव येथील विशाल जयस्वाल, अंजनवतीचे विठ्ठल सपाटे तिवरा येथील रणजित घुसळकर, वाठोडाच्या स्रेहल जायले, विठाळ्याच्या मंगेश ठाकरे, हिंगणगाव येथील मंगला हगवणे, आसेगावच्या अनिता यादव, निंभोरा राज येथील जयंत बमनोटे, कासारखेड येथील उपसरपंच नितीन मेंढुले, उपसरपंचा नंदा सावंत, झाडगाव येथील सरपंचा ललिता रावेकर, तळणी येथील सरपंच रामेश्वर डहाके, कळाशीचे संदीप मिर्चापुरे, झाडा येथील शुभांगी चौधरी, पेठ रघुनाथपूर येथील विजय राऊत, चिंचपूरच्या उषा घटाळे, शेेंदुरजना खुर्द येथील वंदना देशमुख, वाघोलीचे सरपंच विजय गायकवाड, अशोकनगरच्या सरपंच सीमा गुल्हाने, निंबोलीच्या ज्योती पवार, वरूड बगाजी येथील उपसरपंच बिपीन दगडकर, हिरपूर येथील सरपंच रवी बिरे, दाभाडाच्या शशीकला नेवारे, पिंपळखुटा येथील शशीकला माळोदे, जुना धामणगावच्या प्रतीभा ढाकुलकर, जळकापटाचे येथील सरपंच अर्चना सातकर, वसाड येथील कांचन ढोमणे हे लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून जिल्हाप्रशासनाकडे न्याय मागताहेत़ (तालुका प्रतिनिधी)
जागेचा प्रश्न प्रलंबित
४तालुक्यातील अनेक गावांत जागा आहे. ग्रामपंचायतीने संबंधित जागेचा ठराव तालुका प्रशासनाला पाठविला आहे़ यासंदर्भात पंचायत समितीने अहवाल सादर केला़ परंतु ले-आऊट मंजूर करण्यात महसूल प्रशासनाची लेटलतीफची भूमिका आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जागेसंदर्भात प्रकरणच पाठविता येत नसल्याची माहिती आहे. जळगाव आर्वी येथील अनेकांचे घरकूल मंजूर आहेत़ गावात जागाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे मात्र, अनेक दिवसांपासून ही प्रकरणे महसूल विभागात धूळखात पडले आहेत.
सभापती- उपसभापतींनी कंबर कसली
४तालुक्यातील लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून पं.स.सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख वारंवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठपुरावा करीत आहेत. तालुक्यावर होणारा अन्याय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा दूर करीत नसेल तर या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा ईशारा राजनकर व देशमुख यांनी दिला आहे
घरकूल पूर्ण होणार कसे ?
४गोरगरिबांसाठी केंद्र शासनाने इंदिरा आवास योजना सुरू केली़ १२ बाय १२ च्या दोन खोल्या २६९ चौरस फूट बांधकामाकरिता ९५ हजार रूपये या योजनेंतर्गत दिले जातात. मात्र, या अल्प रकमेत घरकूल कसे साकारणार? हाच खरा प्रश्न आहे. शिवाय हे अनुदानसुध्दा वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे
४धामणगाव तालुका अनेक वर्षांपासून इंदिरा आवास तसेच इतर घरकूल योजनांपासून लाभार्थी वंचित आहेत़ हक्काच्या घरासाठी येथील लोकप्रतिनिधी लढत आहेत. अनेक दिवसांपासून बीपीएल यादीचा घोळ कायम आहे़ प्रतीक्षा यादी मोठी आणि तालुक्याला मिळणाऱ्या घरकुलांची संख्या कमी असल्याने आता पालकमंत्र्यांनी या तालुक्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे़