उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:04 PM2019-03-17T22:04:03+5:302019-03-17T22:04:32+5:30
यंदा नियमित रेल्वे गाड्यांमध्ये १५ फेब्रुवारीपासून ‘नो रूम’ असे फलक झळकत असून आरक्षण मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात सुट्यांमध्ये मौजमजा, सहलीला जाण्याचे नियोजन करताना रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल आहेत. किमान उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण करून प्रवास करावा, अशी तयारी आहे. परंतु, अद्यापही उन्हाळी विशेष गाड्य़ांचे वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने अनेकांना या गाड्यांची प्रतीक्षा लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदा नियमित रेल्वे गाड्यांमध्ये १५ फेब्रुवारीपासून ‘नो रूम’ असे फलक झळकत असून आरक्षण मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात सुट्यांमध्ये मौजमजा, सहलीला जाण्याचे नियोजन करताना रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल आहेत. किमान उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण करून प्रवास करावा, अशी तयारी आहे. परंतु, अद्यापही उन्हाळी विशेष गाड्य़ांचे वेळापत्रक जाहीर झाले नसल्याने अनेकांना या गाड्यांची प्रतीक्षा लागली आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा २३ मार्चपर्यत संपणार आहे. तर विद्यापीठ स्तरीय उन्हाळी परीक्षांना १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. बहुतांश कुटुंबात दहावी, बारावीची परीक्षा आटापल्यानंतर उन्हाळी सहल, पर्यटनस्थळी मौजमजा करण्याचे बेत आखले. परंतु, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण फेब्रुवारीपासून ‘नो रूम’ असे झळकत आहे.
विशेषत: मुंबई, पुणे, चैन्नई, बंगळूरू, दिल्ली मार्गे ये- जा करणाऱ्या लांब पल्ल्यांचा नियमित गाड्यांमध्ये आरक्षण नाही. त्यामुळे लांब पल्ल्यांचा प्रवास कसा करावा, हा मोठा गंभीर सहलीचे नियोजन करणाऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे. किंबहुना उन्हाळी विशेष गाड्या सुरू झाल्यास त्या गाड्यांमध्ये आरक्षण करावे आणि सहलीला जावे असे अनेकांनी नियोजन चालविले आहे. मात्र, १५ एप्रिल उजाडल्यानंतरही रेल्वे बोर्डाकडून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. तर, रेल्वे आरक्षण खिडक्यांवर दरदिवसाला सध्या उन्हाळी स्पेशल रेल्वे कधीपासून सुरू होणार, ही विचारणा केली जात आहे.
या गाड्या हाऊसुफल्ल
अमरावती- मुंबई, गोदिंया - मुंबई विदर्भ एक्सप्रेस, नागपूर- पुणे गरीब रथ, हावडा- मुंबई गितांजली, मेल आणि कुर्ला, हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस, अहमदाबाद-चैन्नई नवजीवन एक्सप्रेस, नागपूर - मुंबई दुरंतो, हावडा- पुणे डिलक्स, भुसावळ- निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस, अमरावती- पुणे एक्सप्रेस आदी गाड्यांमध्ये जून २०१९ पर्यंत आरक्षण नाही. फेब्रुवारीपासून या गाड्यांमध्ये हाऊसफुल्ल असे फलक झळकत आहे.
दरवर्षी १५ मार्चपासून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक जाहीर होते. परंतु, रेल्वे बोर्डाकडून उन्हाळी विशेष गाड्या सुरु करण्याबाबत अद्यापपर्यंत घोषणा केलेली नाही. दरदिवशी प्रवाशांकडून या विशेष गाड्यांची माहिती प्रवाशी विचारत आहेत.
- शरद सयाम, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक, बडनेरा