कर्मचाऱ्यांना बदलीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:10 PM2019-05-27T23:10:51+5:302019-05-27T23:11:03+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदली केली जाते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदली केली जाते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत.
ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. आता बहुतांश विभागांच्या बदलीची प्रक्रिया आॅनलाइन पार पाडली जाते. शिक्षक बदलीसाठी विविध गट निर्माण केले जात आहेत. अर्ज सादर केल्यानंतर त्यांची बदली केली जाते तसेच इतर विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या आॅनलाइन पद्धतीने केली जाते. याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने सर्वच विभागांनी बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिक्षण विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. पंचायत समितीकडून याद्या मागविण्यात आल्या आहेत .त्यानुसार याद्या तयार करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाने बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आपल्या अखत्यारीतील बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार केली आहे. याशिवाय वित्त व बांधकाम, सिंचन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागाने बदलीपात्र कर्मचाºयांची यादी करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र अद्याप शासनाकडून बदलासंबंधी कोणताच निर्णय जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला नाही. जिल्हा परिषद शासन आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. आतापर्यंत लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे बदल्यांचे आदेश आले नव्हते आता आचारसहिता संपल्यामुळे कोणत्याही क्षणी बदली आदेश धडकण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने आपली तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसात शासन ग्रामविकास विभागाकडून बदली संबंधाने आदेश देण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सुत्रांनी वर्तविली आहे. त्यामुळे सर्वांचे शासनाच्या या आदेशाकडे लागले आहे.
जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या जिल्हाअंतर्गत बदल्याची कारवाई प्राथमिक स्तरावर सुरू केली आहे. मध्यंतरी लोकसभेची आचारसंहिता असल्याने कारवाई करण्यास अडचणी येत होत्या. मात्र आता आचारसंता संपल्याने बदली संदर्भात शासन आदेश मिळाले नाहीत. आदेश मिळताच कारवाईला गती येईल.
- नारायन सानप, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन