१,४०० कोटींचे कर्ज होणार माफ

By admin | Published: June 25, 2017 12:01 AM2017-06-25T00:01:46+5:302017-06-25T00:01:46+5:30

दीड लाखांपर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केली.

Waiver of Rs 1,400 crore will be waived | १,४०० कोटींचे कर्ज होणार माफ

१,४०० कोटींचे कर्ज होणार माफ

Next

दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा : २५ हजार नियमित खातेदारांनाही लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दीड लाखांपर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केली. याचा जिल्ह्यातील दोन लाख १२ हजार ५६५ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या सर्व शेतकऱ्यांचे ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेले एक हजार ३९८ कोटी ७८ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. त्याचप्रमाणे नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या २५ हजार ३१२ शेतकऱ्यांना २५ हजार रूपयांच्या मर्यादेत अनुदान मिळणार आहे. आर्थिक कोंडीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.
गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ व नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी व शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर कर्जाचा डोंगर झाला. मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, बँका व सावकारांच कर्ज आदीमुळे नैराश्य येऊन, जगावं कसं या विवंचनेत शेतकरी आत्महत्यांत वाढ झाली.

२५ हजारांपर्यंत अनुदान
अमरावती : संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले. ठिकठिकाणी आंदोलकाचा उद्रेक झाला. अखेर शासनाने नमते घेत आंदोलकांशी चर्चा केली. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीविषयीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना जाहीर केली. त्यानुसार एक एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यातील दोन लाख १२ हजार ५६५ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या शेतकऱ्यांचे एक हजार ३९८ कोटी ७८ लाखांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या किमान २५ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. मात्र कर्जमाफीच्या रकमेत व्याजाचा समावेश आहे किंवा नाही, याविषयी संदिग्धता आहे. दर्यापूर येथील शेतकरी बोडखे यांनी याविषयाचा शासनाने सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.

जिल्ह्यातील दीड लाखांपर्यंतचे थकीत कर्जदार
जिल्हा बँकेत ५० हजारांपर्यंत २३ हजार ८५७ शेतकरी कर्जदार आहेत. त्यांचे ९९ कोटी ३२ लाखांचे कर्ज थकीत आहे. एक लाखापर्यंत २५ हजार १३३ शेतकऱ्यांचे १२० कोटी ५४ लाख थकीत आहेत, तर दीड लाखांपर्यंत १२ हजार ८१८ शेतकऱ्यांचे ७३ कोटी एक लाख, असे एकूण ६१ हजार ३०८ शेतकऱ्यांचे २९२ कोटी ८७ लाख रुपये थकीत आहेत.
राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ५० हजारांपर्यंत ८७ हजार ३६३ शेतकरी कर्जदार आहेत. त्यांचे ६४० कोटी ९४ लाखांचे कर्ज थकीत आहे. एक लाखापर्यंत ४५ हजार १८७ कर्जदार शेतकऱ्यांचे ३३१ कोटी ५२ लाख थकीत आहे, तर दीड लाखांपर्यंत १८ हजार ७५ शेतकऱ्यांचे १३२ कोटी ६१ लाख असे एकूण एक लाख ९ हजार ६२५ शेतकऱ्यांचे ११०५ कोटी सात लाख थकीत आहेत.
ग्रामीण बँकांकडे ५० हजारांपर्यंत ५७५ शेतकऱ्यांचे ६ लाखांचे कर्ज थकीत आहेत. एक लाखापर्यंत ५७ शेतकऱ्यांचे २५ लाखांचे कर्ज ३० जून २०१६ पर्यंत असे एकूण ६३२ शेतकऱ्यांचे ८५ लाख थकीत आहेत.

मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान
जिल्ह्यात सद्यस्थितीत २५ हजार ११२ शेतकऱ्यांनी नियमित कर्जाचा भरणा करून यंदाच्या खरिपासाठी पुन्हा कर्जाची उचल केली आहे. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार यापैकी जी रक्कम कमी आहे ती अनुदान म्हणून मिळणार आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जदार ७ हजार १८, ग्रामीण बँकांचे १९३ व जिल्हा बँकेचे कर्जदार १७ हजार ९०१ शेतकऱ्यांना या सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Waiver of Rs 1,400 crore will be waived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.