गावकऱ्यांच्या जागरुकतेमुळेच टळला प्रलय!
By admin | Published: February 5, 2015 11:00 PM2015-02-05T23:00:52+5:302015-02-05T23:00:52+5:30
गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखून केलेल्या सूचनेवरून सोफीयाच्या अधिकाऱ्यांनी धरणातून होणारा पाणी पुरवठा त्वरित थांबविला. तथापि तोपर्यंत लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले होते.
मोर्शी : गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखून केलेल्या सूचनेवरून सोफीयाच्या अधिकाऱ्यांनी धरणातून होणारा पाणी पुरवठा त्वरित थांबविला. तथापि तोपर्यंत लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमिवर गुुरूवारी सकाळी सोफीया प्रकल्पाचे चव्हाण, नरेंद्र गावंडे आणि आरीफ या तीन अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली. प्रत्यक्ष पाहणी दरम्यान जलवाहिनीला मोठे भगदाड पडलेले आढळून आले. नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी या अधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाईची मागणी केली.
सोफीयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तलाठी संतोष गेठे यांनी नुकसानीचा पंचनामा केला. नुकसानीचा अहवाल तहसीलदारांना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जवळपास १२ ते १५ लक्ष रुपयांचे हानी झाली आहे. जवळपास २५ शेतकऱ्यांचे १.५० लक्ष रुपयाचे शेणखत पूर्णपणे वाहून गेले. लढ्ढा यांच्या १ एकर शेतातील उमेश भूजाडे यांनी पेरलेल्या गव्हाचे नुकसान झाले. दोन दिवसा पूर्वीच त्यांनी खते शेतात टाकली होती. ती पूर्णपणे वाहून गेली. दीड लक्ष रुपयांच्या हानीचा दावा भुजाडे यांनी केला.