बचतगटाच्या माध्यमातून हरिसालची आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:02 PM2018-02-25T23:02:56+5:302018-02-25T23:02:56+5:30
महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध लघुउद्योग सुरू झाल्याने डिजिटल हरिसालची आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध लघुउद्योग सुरू झाल्याने डिजिटल हरिसालची आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला.
डिजिटल ग्राम हरीसाल येथे महिला आर्थिक विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ग्रामोद्योग केंद्रांतर्गत विविध बचत गटाच्या माध्यमातून डाळ मिल, द्रोण निर्मिती आदी अनेक लघु उद्योगांचा शुभारंभ ना. पोटे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. धारणीचे उपविभागीय अधिकारी विजय राठोड यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.मेळघाटातील विविध गावांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून लघुउद्योग, गृहउद्योगांना चालना देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. हरिसालमध्ये ग्रामोद्योग केंद्रांतर्गत मिनी डाळ मिल, आटा चक्की, मिरची कांडप आदी लघुउद्योगांमुळे गाव व परिसर आर्थिक स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्र्वास पालकमंत्री प्रवीण पोट यांनी व्यक्त केला.यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.