पावसाने भारत डायनॅमिक लिमिटेडची भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:10 AM2021-06-28T04:10:45+5:302021-06-28T04:10:45+5:30
फोटो पी २७ नांदगाव पेठ नांदगाव पेठ : नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीत असलेल्या भारत डायनॅमिक कंपनीची सुरक्षा भिंत शनिवारच्या ...
फोटो पी २७ नांदगाव पेठ
नांदगाव पेठ : नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीत असलेल्या भारत डायनॅमिक कंपनीची सुरक्षा भिंत शनिवारच्या पावसाने कोसळली. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाच वर्षांत ही भिंत दोन वेळा कोसळली असून, पावसाने कंत्राटदाराचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या भारत डायनॅमिक कंपनीने याठिकाणी शस्त्रसाठा तयार करण्यासाठी जमीन खरेदी केली असून, अद्याप काम सुरू झालेले नाही, हे विशेष!
सावर्डीनजीक महामार्गालगत पाचशे एकर जमीन भारत डायनॅमिक कंपनीने अधिग्रहित केलेली आहे. तेथे शस्त्रसाठा तयार करण्याची योजना असून, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी संरक्षण भिंत बांधण्यात आली. परंतु, भिंत बांधताना कंत्राटदाराने सुरक्षेचा विचार न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे आजवर दोनवेळा ही भिंत कोसळली आहे. यामध्ये केवळ कंत्राटदाराने केलेला भ्रष्टाचार मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे.