तळणीत अखेरच्या विसाव्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:12 AM2021-05-08T04:12:36+5:302021-05-08T04:12:36+5:30

पान २ लिड फोटो पी ०७ तळणी धामणगाव रेल्वे : आयुष्य सरल्यानंतर दुसऱ्याच कुणाच्या शेताच्या धुऱ्यावर, बांधावर अखेरचा ...

Wandering for a final rest in the frying pan | तळणीत अखेरच्या विसाव्यासाठी भटकंती

तळणीत अखेरच्या विसाव्यासाठी भटकंती

Next

पान २ लिड

फोटो पी ०७ तळणी

धामणगाव रेल्वे : आयुष्य सरल्यानंतर दुसऱ्याच कुणाच्या शेताच्या धुऱ्यावर, बांधावर अखेरचा विसावा घेण्याची, मृतदेह नेऊन जाळण्याची पाळी तालुक्यातील तळणी येथे आली आहे. स्मशानभूमीची जागा समृद्धी महामार्गाच्या रस्ते विकास महामंडळाने अधिग्रहीत केली. त्यामुळे येथे अखेरचा विसाव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुक्यातील १२०० लोकसंख्या असलेले तळणी हे गाव या गावाच्या परिसरातून समृद्धी महामार्ग गेला आहे. येथे पूर्वी असलेल्या स्मशानभूमीची ई-क्लासची जागा समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहीत केली. आता जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाला ही जागा दिली. पूर्वी ज्या स्मशानभूमीच्या जागेवर मृतदेहाचा दफनविधी, अंत्यसंस्कार करण्यात येत असे, त्या परिसरात समृद्धी महामार्ग झाला आहे. गाव परिसरात ई-क्लासची जागा नसून, तब्बल दोन किलोमीटर अंतरावर आहे. आपल्या गावाच्या परिसरात स्मशानभूमी व्हावी म्हणून येथील उपसरपंच विशाल भैसे यांनी जिल्हा प्रशासनापर्यंत पत्रव्यवहार केला. एवढेच नव्हे तर वस्तुस्थिती थेट विभागीय आयुक्तांपर्यंत मांडली. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने पाठ फिरवली आहे. उन्हाळ्याच्या काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर कुठेही अंत्यसंस्कार करता येईल, मात्र पावसाळ्यात दोन किलोमीटर अंतरापर्यंत मृतदेह न्यायचा कसा. असा प्रश्न येथील उपसरपंच विशाल भैसे यांनी विचारला आहे. पुढील काळात जागा उपलब्ध न झाल्यास समृद्धी महामार्गावरच अंत्यसंस्कार करण्यात येईल, असा इशारा विशाल भैसे यांनी दिला आहे

Web Title: Wandering for a final rest in the frying pan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.