स्मार्ट सिटीची वाट खडतरच !

By admin | Published: June 10, 2016 11:59 PM2016-06-10T23:59:39+5:302016-06-10T23:59:39+5:30

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतल्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती महापालिकेला २५ ते ३० जून दरम्यान प्रस्ताव सादर करावयाचा आहे.

Wandering smart city! | स्मार्ट सिटीची वाट खडतरच !

स्मार्ट सिटीची वाट खडतरच !

Next

३० जूनची डेडलाईन : सर्वसमावेशक, त्रुटीरहित प्रस्ताव पाठविण्याचे दिव्य
अमरावती : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतल्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती महापालिकेला २५ ते ३० जून दरम्यान प्रस्ताव सादर करावयाचा आहे. त्यासाठी नव्याने प्रस्ताव सादर करावा लागणार असून या प्रस्तावाला महासभेची मान्यता आवश्यक आहे. तथापि महापालिका यंत्रणा आणि संबंधित एजन्सीच्या कामाची गती पाहता स्मार्टसिटीची वाट खडतरच राहणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
स्मार्ट सिटीमध्ये जी शहरे निवडली गेली त्या शहरांनी दाखल केलेल्या प्रस्तावांचा अभ्यास आणि त्रुटीरहित ‘डीपीआर’ पाठविण्याचे आव्हान महापालिका यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. मात्र, ज्या तऱ्हेने ‘स्मार्टसिटी प्रकल्पाचे काम अपेक्षित आहे. ते होत नसल्याने अमरावती महापालिकेचा प्रस्ताव सर्वसमावेशक आणि निवडीसाठी पात्र होईलच, याबाबत लोकप्रतिनिधींनी शंका उपस्थित केली आहे. स्मार्टसिटीच्या प्रथम फेरीमध्ये अमरावती शहराचा समावेश न झाल्याने आता दुसऱ्या फेरीसाठी महापालिकेला फेरप्रस्ताव (डीपीआर) पाठवायचा आहे. महापालिकेच्या हाती केवळ पंधरवाडा शिल्लक आहे. या पंधरवाड्यात सर्वसमावेशक डीपीआर तयार करण्याचे दिव्य यंत्रणेला पेलावे लागणार आहे. स्मार्ट मोबालिटी ट्रान्सपोर्टसाठी ‘वॉल्टर पी.मूर’ या एजन्सीसोबत तर नेटवर्क सोल्यूशनसाठी ‘स्मार्ट टेक सोल्यूशन’ या पुणे स्थित एजन्सीसोबत पालिकेने ‘एमओयू’ केला आहे. यापैकी ‘वॉल्टर डी. मूर’ ही एजन्सी शहराचे सर्वेक्षण करीत असून त्यात पार्किंग, वाहतूक व्यवस्था व एकंदरीतच स्मार्ट सिटीच्या अनुशंगिक बाबी समाविष्ट राहतील. ही एजन्सी ‘स्मार्ट सिटी’ प्रस्तावाचे ‘ड्राफ्टिंग’ महापालिकेला करून देईल. ‘स्मार्टटेक सोल्यूशन’ ही एजन्सी ‘वायमॅक्स टेक्नॉलॉजी सिस्टिम’वर काम करीत आहे. ७५० एकर क्षेत्राचा पुनर्विकास आणि ३०० एकर क्षेत्रातील ग्रीनफिल्ड एरियाचा फेरप्रस्तावात अंतर्भाव केला जाणार आहे. एकंदरीतच फेरप्रस्ताव आणि एजन्सींसोबत करार करण्यास उशिर झाल्याने स्मार्टसिटीचा प्रस्ताव अत्युच्च दर्जाचा होईल का?, हा प्रश्न आहे. फेरप्रस्तावाच्या सर्वसमावेशकतेवरच शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड अवलंबून आहे.

Web Title: Wandering smart city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.