‘अचलपुरात वाॅर्डनिहाय लसीकरण करावे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:30+5:302021-07-07T04:14:30+5:30

अचलपूर : भाजप अचलपूर शहर मंडळच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना वाॅर्डनिहाय लसीकरण शिबिर घेण्याबाबत निवेदन देण्यात ...

‘Ward wise vaccination in Achalpur’ | ‘अचलपुरात वाॅर्डनिहाय लसीकरण करावे’

‘अचलपुरात वाॅर्डनिहाय लसीकरण करावे’

Next

अचलपूर : भाजप अचलपूर शहर मंडळच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना वाॅर्डनिहाय लसीकरण शिबिर घेण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी अचलपूर शहर मंडळ अध्यक्ष अभय माथने, उपाध्यक्ष शंकर बाछाणी, मल्हाराचे सरपंच नारायण बोरेकर, राजेश चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष महेश कडू, सरचिटणीस श्याम मांडेकर, जहूर, योगेश थोरात, आशिष मानमोडे, जयनारायण मंडले, प्रकाश नंदवंशी, जाहेद खान, प्रफुल कुऱ्हेकर आदी उपस्थित होते.

----------

मुलगी एकटी असताना घरात घेतला प्रवेश

मोर्शी : तालुक्यातील ग्राम पिंपरी येथे ११ वर्षीय मुलगी घरी एकटी असताना इमरत भारत चौधरी (४५) हा घरात शिरला व आतून कडी लावून घेतली. तिच्या अंगाला हात लावला आणि ती रडली असता गालावर थप्पड लगावली, अशी तक्रार मोर्शी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

---------------

अपघाताची पथ्रोट पोलीस ठाण्यात तक्रार

पथ्रोट : नजीकच्या परसापूर पुलाजवळ १९ जून रोजू रमेश शालिकराम कासदेकर (रा. डोमी) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली होती. २१ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ४ जुलै रोजी हिरा बाटू बेठेकर यांनी पथ्रोट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

Web Title: ‘Ward wise vaccination in Achalpur’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.