२८ देशांच्या दूतावासात पोहोचली मेळघाटातील वारली पेंटिंग; पंतप्रधान मोदींनाही पाठवली शुभेच्छापत्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 05:55 AM2021-11-02T05:55:55+5:302021-11-02T05:56:10+5:30

चिखलदरा तालुक्याच्या जैतादेही येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम राबविला.

Warli painting from Melghat reaches embassies of 28 countries; Congratulatory letters also sent to Prime Minister Modi | २८ देशांच्या दूतावासात पोहोचली मेळघाटातील वारली पेंटिंग; पंतप्रधान मोदींनाही पाठवली शुभेच्छापत्रे

२८ देशांच्या दूतावासात पोहोचली मेळघाटातील वारली पेंटिंग; पंतप्रधान मोदींनाही पाठवली शुभेच्छापत्रे

Next


नरेंद्र जावरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा (जि. अमरावती) : शिक्षकांना विषय सुचला, आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात कुंचला दिला नि महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग कागदावर चितारण्यात आली. इवल्याशा हातांनी साकारलेली दिवाळीची शुभेच्छापत्रे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते गावातील सरपंचापासून थेट सातासमुद्रापार अमेरिकेसारख्या देशातील मान्यवरांना त्या-त्या देशांच्या दूतावासामार्फत मेळघाटातून पाठवली जात आहेत. 

चिखलदरा तालुक्याच्या जैतादेही येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम राबविला. पोस्टाद्वारे ही शुभेच्छापत्रे २८ देशांच्या दूतावासांकडे रवाना झाली आहेत. या शाळेने यापूर्वीसुद्धा राज्यस्तरावर मग्रारोहयोअंतर्गत परसबाग, फळबाग व जैवविविधता हा अभिनव उपक्रम राबविला होता. पुन्हा शाळेने दिवाळीनिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना शुभेच्छापत्रे बनविणे शिकवून त्यात भर घातली. शिक्षक गणेश जामूनकर, जितेंद्र राठी, शुभांगी येवले यांनी पहिली ते सातवीपर्यंतच्या ८७ विद्यार्थ्यांच्या हाताने हे कार्य झाले. इतरही विद्यार्थ्यांना हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.
अनाथालयातील विद्यार्थ्यांपासून ते युनो युनिसेफपर्यंत शुभेच्छा संदेशांचा प्रवास झाला आहे. जपान, अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, कॅनडा, रशिया, फ्रान्स आदी देशांना शुभेच्छापत्र पाठविण्यात आली आहेत.

वारली पेंटिंग 
महाराष्ट्राची ओळख
nदिवाळी शुभेच्छापत्रांच्या दर्शनी पृष्ठभागावर महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग आदिवासी विद्यार्थ्यांनी काढली. 
nत्यावर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा... असा संदेश देत पोस्टाद्वारे सातासमुद्रापार महाराष्ट्राची ओळख पाठविली गेली आहे. 
शाळेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. तिन्ही शिक्षकांनी हा 
अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरविले आणि चिमुकल्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून वारली पेंटिंग शुभेच्छापत्रे तयार करून ती आता देशाचे पंतप्रधान, सातासमुद्रापार व मान्यवरांना पोस्टाद्वारे पाठविली जात आहेत.
- गणेश जामूनकर, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, जैतादेही, ता. चिखलदरा

Web Title: Warli painting from Melghat reaches embassies of 28 countries; Congratulatory letters also sent to Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.