भिंतीवर चितारली वारली पेंटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:56 PM2018-12-31T22:56:39+5:302018-12-31T22:56:55+5:30
अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय चिखलदरा पंचायत समितीच्या बदललेल्या रुपाने आला आहे. भकास कार्यालयाचा आज पूर्णत: कायापालट झाला आहे. परिविक्षाधिन आएएस अधिकारी तथा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मिताली सेठ यांनी कर्मचाºयांच्या मदतीने दालनांना दारे लावून घेतली.
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय चिखलदरा पंचायत समितीच्या बदललेल्या रुपाने आला आहे. भकास कार्यालयाचा आज पूर्णत: कायापालट झाला आहे. परिविक्षाधिन आएएस अधिकारी तथा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मिताली सेठ यांनी कर्मचाºयांच्या मदतीने दालनांना दारे लावून घेतली. पंचायत समिती इमारतीच्या भिंतींवर स्वत: आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी वारली पेंटिंग चितारली. त्यात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात आले.
मळलेल्या भिंती, विना दाराचे दालने, अधिकारी-कर्मचाऱ्यांना आलेली मरगळ झटकून टाकत या संपुर्ण कार्यालयाला आता नवी झळाळी आली आहे. इमारतीच्या दुरावस्थेबाबत सेठी यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. ‘लोकमत’ने त्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकत त्याबाबतचे वास्तव लोकदरबारात मांडले होते. त्याची दखल घेत सेठी यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी २८ व २९ डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा घेतली. त्यात ४६ विद्यार्थी आणि ६० कर्मचारी व शिक्षक सहभागी झाले. श्रमदानातून स्वच्छता मोहीम घेण्यात आली.