वरुडात मुनादी देऊन अतिक्रमणधारकांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:23 AM2020-12-03T04:23:27+5:302020-12-03T04:23:27+5:30
वरुड :- स्थानिक नगर परिषद हद्दीत रहदारीला अडथळा होत असून वाहतूक विस्कळीत होत असल्याने नगर परिषद प्रशासन आणि पोलीस ...
वरुड :- स्थानिक नगर परिषद हद्दीत रहदारीला अडथळा होत असून वाहतूक विस्कळीत होत असल्याने नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन संयुक्त मोहीम राबविणार असल्याने अतिक्रमणधारकांनी तात्काळ अतिक्रसम काढण्याकरिता शहरात मुनादी दिली . अन्यथा अतिक्रमण धारकांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे .
वरुड शहरातील राष्ट्रीय महामार्ग , अप्रोच रोड , रिंग रोड , मेन रोड तसेच शहरातील मुख्य चौकात अतिक्रमण वाढले . यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो तर वाहतुकीमध्ये सुद्धा व्यत्यय येतो . अनेक दुकानदारांनी दुकानासमोर टिन शेड लावून वर्दीलीच्या जागेवर बस्तान थाटले आहे . यातून अनेक वाद निर्माण झाल्याने शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर तसेच दुकानदारांनी दुकानापुढे केले अतिक्रमण काढण्याची मोहीम नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन राबवून कायदेशीर कारवाही करणार असल्याबाबत शहरात मुनादी दिल्या जात आहे . अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ माजली आहे .
रहदारीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढणार - मुख्याधिकारी रवींद्र पाटील
शहरात मोठ्या प्रमाणावर दुकानापुढे टिन शेड टाकून रहदारीस अडथळा निर्माण झाल्याने रस्ते खुले करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागर परिषद आणि पोलीस प्रशासन सयुंकपणे अतिक्रमण काढणाची मोहीम राबविणार आहे . याकरिता अतिक्रमण धारकांनी तात्काळ अतिक्रमण काढून नगर परिषदेस सहकार्या करावे आणि कारवाही टाळावी असे आवाहन करणारी मुनादी दिल्या जात आहे असे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांनी सांगितले .
[16:23, 12/2/2020] Sanjay Khasbage Warud: