कोरोना ते अवैध रेती तस्करी जुगाऱ्याना जेरबंद करण्याच्या कारवाईने गाजला वरुड तालुका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:14 AM2020-12-31T04:14:24+5:302020-12-31T04:14:24+5:30
वरुड :- २०२० चा सूर्योदय झाला आणि जागांसह देशावर संकटाचे सावटामागे सावट आले . आणि वरुड तालुक्यावर कोरोनाचे संकट ...
वरुड :- २०२० चा सूर्योदय झाला आणि जागांसह देशावर संकटाचे सावटामागे सावट आले . आणि वरुड तालुक्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले . २१ मार्च पासून लॉक डाऊन सुरु झाला . पहिल्यांदा एकाच परिवारातील चार रुग्ण आढळून आले होते आणि वरुड मध्ये कहर माजला . लॉक डाऊन सुरु झाल्याने सर्वत्र संचारबंदी झाली रस्ते ओस पडले अनेकांनी पोलिसांचा प्रसादही खाल्ला. पाहता पाहता लॉक डाऊन मध्ये वरुड तालुक्याची अधिअकार्यानी बाजू संभाळली परंतु लॉक डाऊन शिथिल होताच कोरोना कोविद ने डोकं वर काढलं आणि पाचशे पेक्षा अधिक रुग्णाला निघाले तर अनेकांनी मृत्यूला कवटाळले . जून नंतर जनजीवन सुरु उद्योगाला सुरुवात झाली . यामध्ये वरुड चे तहसीलदार सुनील सावंत यांची बदली होऊन किशोर गावंडे नवे तहसीलदार रुजू झाले तर ठाणेदार मगन मेहते यांची दुर्गाउत्सवानानंतर बदली झाली आणि ठाणेदार म्हणून श्रेणिक लोढा रुजू झाले . कोरोनामुळे सणवार उत्सवारंवार कोरोना चे संकट आले . मंदिरे बंद होती . मात्र मंदिरालये खुली झाली होती . सार्वजनिक , खासगी असल्याने विवाह सोहळे रद्द झाली तर मर्यादित लोकांमध्ये कार्यक्रम पार पाडू लागले . विना मास्क विनाकारण फिरणार्यावर कार्रवाहीचा बडगा उगारल्या गेला . नोव्हेंबर १ ला ठाणेदार म्हणून परीक्षाविधीन आयपीएस अधिकारी वरुड चे ठाणेदार म्हणून श्रेणिक लोढा रुजू झाले . रुजू होताच ४ नोव्हेंबर ला रेटीतस्कारावर धडक कारवाही करून तब्बल ३५ डंपर जप्त करून रेती तस्करांनी सरकारी कार्रवाहीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून कारवाही केली . या कार्रवाहीत शासनाच्या तिजोरीत एक कोटीपेक्षा अधिक दंडात्मक रक्कम वरुडच्या इतिहासात पहिल्यांदा जमा झाली. यानंतर पुन्हा सात ट्रेलर वजा डंपर जप्त केले . एवढ्यावरच कारवाही थांबली नाही तर आंबली पदार्थ विक्रेत्यांसह अवैध धंदे करणारे , जुगार्याना सुद्धा जेरबंद केले . शहरात वाहतुकीला अडसर ठरणाऱ्या अतिक्रमणावर वक्र नजर फिरवून नगर परिषद मुख्यधिकाऱ्याच्या मदतीने शहरातील २० वर्षाचे अतिक्रमण काढले . २०२० हे वर्ष वरुड शहर आणि तालुक्यासाठी अडचणीचे ठरले परंतु कायदा आणि सुवस्थेकरिता मात्र वरदान ठरले . ठाणेदार श्रेणिक लोढामुळे अवैध धंदे करणाऱ्याना चांगलाच चाप बसला . आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली . तर वरुड च्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान शांतता राहावी म्हणून अवैध दारू विक्री करणारे किरकोळ आणि ठोक परवानाधारकांना नोटिसा बजावून ३९ अवैध दारू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कारवाही केली . अधिकारी आणि पोलिसांच्या कार्रवाहीचे सर्वसामान्यांनी स्वागत करून आयपीएस श्रेणिक लोढा हे वरुड तालुक्याला स्टार ठाणेदार ठरले .