वरूडला रक्तपेढी होण्याकरिता प्रयत्न करणार

By admin | Published: January 15, 2016 12:40 AM2016-01-15T00:40:09+5:302016-01-15T00:40:09+5:30

ग्रामीण रुग्णालयांतर्गत रक्तदाता संघ स्थापन करून एक वर्षात ५ हजार ९१ रक्त पिशव्या गोरगरीब आणि गरजू रुग्णांना मोफत दिल्या.

Warwood will try to become a blood bank | वरूडला रक्तपेढी होण्याकरिता प्रयत्न करणार

वरूडला रक्तपेढी होण्याकरिता प्रयत्न करणार

Next

प्रवीण पोटे : रक्तदाता संघाची वर्षपूर्ती, ८६ रक्तदात्यांचा गौरव
वरूड : ग्रामीण रुग्णालयांतर्गत रक्तदाता संघ स्थापन करून एक वर्षात ५ हजार ९१ रक्त पिशव्या गोरगरीब आणि गरजू रुग्णांना मोफत दिल्या. रक्तदाता संघाचे कार्य अतुलनीय आणि जिल्ह्याकरिता भूषणावह आहे. वरुडला रक्तपेढी व्हावी, यासाठी आपण शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री व उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी रक्तदाता संघाच्या वर्धापन दिनानिमित्त स्थानिक माधवराव काठीवाले सभागृहात आयोजित कार्यक्रमात केले.
रुग्णांचे प्राण वाचविण्याकरिता धडपड करणारे येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांची चमू अभिनंदनास पात्र आहे, असेही ना. पोटे ेयांनी सागितले. अध्यक्षस्थानी आ. अनिल बोंडे, विशेष अतिथी म्हणून अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आ.बच्चू कडू, माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी म्हाडा अध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, नगराध्यक्ष रविंद्र थोरात, शेंदूरजनाघाटच्या नगराध्यक्ष सरिता खेरडे, आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, प्रादेशिक न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, रक्तसंक्रमण पेढीचे विलास जाधव, हेडगेवार रक्तपेढी नागपूरचे सचिव अशोक पत्की, संचालक प्रकाश कुंडले, नायब तहसीलदार सुनील रासेकर, सहायक पोलीस निरीक्षक चित्तरंजन चांदुरे, तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख, नारायण फरकाडे, सत्यशोधक फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर आंडे, प्रवीण चौधरी, राजेंद्र राजोरीया, राम गोधणे, खालीकभाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर माहोरे, देवेंद्र भुयार, नीलेश मगर्दे, राजाभाऊ कुकडे, जि.प.सदस्य विक्रम ठाकरे, प्रभाकर काळे, तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, रक्तदाता संघाचे अध्यक्ष जितेंद्र शेटीये उपस्थित होते.
खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन उपसंचालकपदावर विराजमान होणाऱ्या विजय ठाकरे यांचा तर रक्तसंकलनाकरिता सहकार्य करणाऱ्या उपसंचालक अविनाश लव्हाळे, जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, विलास जाधव आणि चमू तसेच हेडगेवार रक्तपेढीचे सचिव अशोक पत्की, प्रवीण पाटीलसह चमू तसेच ज्ञानेश्वर बहुरुपी, अख्तर बेग, अशोक चौधरी, छाया घ्यार, संजय खासबागे, योगेश ठाकरे, संजय बेले, अतुल काळे, दीपक खंडेलवाल, चंद्रकांत भड, प्रभाकर लायदे, नीलेश लोणकर, विलास पाटील, सचिन वानखडे, स्वप्निल आजनकर यांचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री पोटे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयात उत्तम आरोग्य सेवा देणारे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार आणि मनीष या दाम्पत्याचा सपत्नीक गौरव करण्यात आला. प्रास्ताविक रक्तदातासंघाचे संजय खासबागे यांनी केले. संचालन चरण सोनारे, सुधाकर राऊत यांनी तर आभार प्रदर्शन संघाचे अध्यक्ष जितेंद्र शेटिये यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Warwood will try to become a blood bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.