‘ते’ मेळघाटात पैशांचा पाऊस पाडणार होते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 05:00 AM2020-03-06T05:00:00+5:302020-03-06T05:00:37+5:30

खंडुखेडा जंगलातील अवैध वृक्षतोडीचा अंदाज घेत असताना मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील विजय चंद्रकांत शर्मा, प्रकाश रामजिनरे, युगराज शहाण्या गंधार, जितेंद्र उदयलाल मालवीय, दिलीप कल्लू मालवीय, विपीन विजय यादव हे वन्यजीव विभागाच्या सापळ्यात अडकले. तेव्हा त्यांनी वृक्षतोडीला बगल देत, कासवाची पूजा करून पैशांचा पाऊस पाडण्याकरिता आल्याचे चौकशी अधिकारी तथा सिपना वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांना सांगितले अन् यात तेच अडकलेत.

'That' was about to rake in the money! | ‘ते’ मेळघाटात पैशांचा पाऊस पाडणार होते!

‘ते’ मेळघाटात पैशांचा पाऊस पाडणार होते!

Next
ठळक मुद्देचोबितातही वृक्षतोड : वनतस्करांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत खंडुखेड्यात अवैध वृक्षतोड करणारे परप्रांतीय वनतस्कर कासवाची पूजा करून मेळघाटात ‘पैशांचा पाऊस’ पाडणार होते. ही माहिती त्यांनी खुद्द चौकशी अधिकाऱ्यांना दिली. मेळघाट प्रादेशिक वनविभागातील चोबिता वर्तुळात यापूर्वी अवैध वृक्षतोड करून घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
खंडुखेडा जंगलातील अवैध वृक्षतोडीचा अंदाज घेत असताना मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील विजय चंद्रकांत शर्मा, प्रकाश रामजिनरे, युगराज शहाण्या गंधार, जितेंद्र उदयलाल मालवीय, दिलीप कल्लू मालवीय, विपीन विजय यादव हे वन्यजीव विभागाच्या सापळ्यात अडकले. तेव्हा त्यांनी वृक्षतोडीला बगल देत, कासवाची पूजा करून पैशांचा पाऊस पाडण्याकरिता आल्याचे चौकशी अधिकारी तथा सिपना वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांना सांगितले अन् यात तेच अडकलेत. वृक्षतोडीच्या गुन्ह्यानंतर ‘पैशांचा पाऊस’संदर्भात वन्यजीव कायद्यांतर्गत त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला. या दुसºया गुन्ह्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले अन् त्यांना तुरुंगात जावे लागले. त्यांच्याकडील ३२ हजार रुपयेही चौकशी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही पूजा करण्याकरिता मागाहून ना महाराज आलेत, ना कासव पोहोचले. पैशांचा पाऊस पडलाच नाही. या प्रकरणात पुढील चौकशी सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील करीत आहेत. दरम्यान, याच वनतस्करांनी मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत चोबिता वर्तुळात वृक्षतोड केल्याची माहिती वन्यजीव विभागाला दिली.

अशीही वृक्षतोड
वनतस्करांना एका वेळेला एका ठिकाणाहून दोन ते तीन लाखांचा माल आवश्यक असतो. अशाच ठिकाणी ते वृक्षतोड करवून घेतात. मोबाइलवर मागणी नोंदवून सागवान लाकूड संबंधिताला पुरवितात. काम फत्ते झाल्यानंतर ते त्या परिसराला आग लावतात,

प्रादेशिक वनविभागात चौकशी
चोबिता वर्तुळात झालेल्या वृक्षतोडीची उपवनसंरक्षक अविनाश कुमार यांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. चौकशीच्या पहिल्या टप्प्यात मोबाइल स्कॉडद्वारे चौकशी करण्यात आली. स्थानिक वनकर्मचाºयांनीही पाहणी केली आहे. यात त्यांना अत्यल्प वृक्षतोड आढळून आली आहे.

Web Title: 'That' was about to rake in the money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.