एकीकडे पाण्याचा अपव्यय, दुसरीकडे नाकारली जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:12 AM2021-07-30T04:12:34+5:302021-07-30T04:12:34+5:30

करजगाव : मुख्य जलवाहिनीवर नळ जोडणी देता येणार नसल्याचे सांगत करजगाव ग्रामपंचायतीने एका व्यक्तीला पाणी नाकारले आहे. दुसरीकडे पाण्याचा ...

Waste of water on the one hand, rejected connection on the other | एकीकडे पाण्याचा अपव्यय, दुसरीकडे नाकारली जोडणी

एकीकडे पाण्याचा अपव्यय, दुसरीकडे नाकारली जोडणी

Next

करजगाव : मुख्य जलवाहिनीवर नळ जोडणी देता येणार नसल्याचे सांगत करजगाव ग्रामपंचायतीने एका व्यक्तीला पाणी नाकारले आहे. दुसरीकडे पाण्याचा मोठा अपव्यय होत असून, मुख्य पाईपवरच अनेक नळ जोडले गेले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, करजगाव ग्रामपंचायतमार्फत बोअरवेलद्वारे संपूर्ण गावात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, ग्रामपंचायतीने अमोल इंगळे यांना पाणीपुरवठा करण्यास साफ नकार दिला. ते गावातच त्यांच्या शेतात घर बांधून राहत आहेत. त्यांनी नळ योजनाद्वारे पाणीपुरवठ्याकरिता अर्ज सादर केला असता, मुख्य जलवाहिनी असल्याचे कारण देत मासिक सभेत नळ जोडणी नाकारण्यात आली. गावात मुख्य जल वाहिनीवरच अनेक जोडणी आहेत. यामधून लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. याशिवाय भालेवाडी बोअरवेलच्या वॉर्ड २ मधील फंटापुरा येथील पुलावरील मुख्य जलवाहिनीच्या लीकेजमुळे लाखो लिटर प्रतिदिवस पाणी वाया जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने हेतुपुस्सर नळजोडणीला नकार दिल्याचे इंगळे यांचा आक्षेप आहे.

------------

कोट येत आहे.

Web Title: Waste of water on the one hand, rejected connection on the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.