अमरावती जिल्ह्यात खतांच्या विक्रीवर १६ पथकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:13 AM2021-05-26T04:13:05+5:302021-05-26T04:13:05+5:30

अमरावती : रासायनिक खतांच्या किमतीमध्ये जे बदल होत गेले, त्यानुसारच शेतकऱ्यांना विक्री व्हावी, याकरिता कृषी विभागाच्या १६ पथकांचा ‘वॉच’ ...

Watch of 16 teams on sale of fertilizers in Amravati district | अमरावती जिल्ह्यात खतांच्या विक्रीवर १६ पथकांचा वॉच

अमरावती जिल्ह्यात खतांच्या विक्रीवर १६ पथकांचा वॉच

Next

अमरावती : रासायनिक खतांच्या किमतीमध्ये जे बदल होत गेले, त्यानुसारच शेतकऱ्यांना विक्री व्हावी, याकरिता कृषी विभागाच्या १६ पथकांचा ‘वॉच’ सुरू आहे. विक्रेत्यांद्वारे वाढीव किमतीमध्ये खत विकल्याचा प्रकार निदर्शनात येताच त्या दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. रोहिणी नक्षत्राला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे व शेतकरीही पेरणीपूर्व मशागतीमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान कंपन्यांद्वारे खतांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. केंद्र शासनाने अनुदान वाढविल्यानंतर खतांच्या किमती कमी झाल्या आहेत. मात्र, दुकांनामध्ये वाढीव किंमत छापलेल्या खतांच्या बॅगा विक्रीला आहे. मात्र, संचारबंदीच्या काळात विहित कालावधीत सुरू असलेल्या दुकांनात सध्या तरी शासनदराने विक्री होत आहे व कृषी विभागाचे पथकदेखील आकस्मिक भेटी देत असल्याचे दिसून आले. पालकमंत्री व जिल्हाधिकारी याविषयी सातत्याने आढावा घेत आहे.

जिल्ह्यात रासायनिक खतांचे असे आहेत दर (रुपयामध्ये)

युरिया (४५ किलो, निमकोटेड) - २६६.५ रुपये, डीएपी - १२०० रुपये, २४:२४:०० - १४५० रुपये, २४:२४:००:०८ - १५०० रुपये, २०:२०:००:१३ - ९७५, १०५०, ११५० , १०९० व १०७५ रुपये, १९:१९:१९ - १५७५ रुपये, १०:२६:२६:०० - ११७५, १३००, १३९०, १३७५, १३५० रुपये, १२:३२:१६ - ११८५, १३७०, १३१० व १३०० रुपये, १४:३५:१४ - १४००, १३६५ रुपये, १६:२०:००:१३ - १००० रुपये, १६:१६:१६ - १००० रुपये, २८:२८:०० - १४५०, १४७५ रुपये, १५:१५:१५:०९ - ११५० रुपये

Web Title: Watch of 16 teams on sale of fertilizers in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.