एमपी, तेलंगणा बॉर्डरवर जीएसटी पथकांचा वॉच, वस्तू व सेवाकर विभाग लागला कामाला

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 8, 2024 04:13 PM2024-04-08T16:13:04+5:302024-04-08T16:13:26+5:30

४० अधिकारी, १०० कर्मचाऱ्यांद्वारे वाहन तपासणी

Watch of GST teams on MP, Telangana border, goods and service tax department started work | एमपी, तेलंगणा बॉर्डरवर जीएसटी पथकांचा वॉच, वस्तू व सेवाकर विभाग लागला कामाला

एमपी, तेलंगणा बॉर्डरवर जीएसटी पथकांचा वॉच, वस्तू व सेवाकर विभाग लागला कामाला

गजानन मोहोड, अमरावती: जिल्हा सीमेसह व आंतरराज्य सीमेवरील मध्य प्रदेश व तेलंगणा बॉर्डरच्या नाक्यावर वस्तू व सेवा कर विभागाद्वारे वाहनांची तपासणी सुरू आहे. या विभागाचे ४० अधिकारी व १०० कर्मचारी यांच्या पथकांद्वारे पाचही जिल्ह्यांतील चेकपोस्टवर वॉच आहे.

मालाची वाहतूक करताना वस्तू व सेवाकर कायद्याच्या कलम ६८ व नियम १३८ आवश्यक असणारे योग्य टॅक्स इन्व्हॉइस व ई-वे बिल आहे किंवा नाही याची तपासणी विभागाच्या मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. मालाचे वजन, किंमत, संख्या, टॅक्स इन्व्हॉइस व गाडीतील माल यात तफावत किंवा त्रुटी आढळल्यास नियम १२९ नुसार कराच्या २०० टक्क्यांपर्यंत दंड लावण्याची कठोर कारवाई विभागाचे अधिकारी करीत आहेत. विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये ई-वे बिल तपासणी मोहीम या विभागाचे राज्यकर सहआयुक्त संजय पोखरकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

अमरावती जिल्ह्यात नांदगाव टोल नाका, खरपी नाका, वरुड- रवाळा (एमपी बॉर्डर), पिंपळखुटा-केळापूर महाराष्ट्र-तेलंगणा बॉर्डरवर पथके तैनात असून वाहनांची कसून तपासणी होत आहे.

या नाक्यावर पथकांद्वारे तपासणी

  • अमरावती : मुंबईकडे जाणारा जुना राष्ट्रीय महामार्ग
  • यवतमाळ : नागपूर-नांदेड महामार्ग
  • अकोला : छत्रपती संभाजीनगर- जळगाव-नागपूर महामार्ग
  • वाशिम : जालना- वाशिम राज्य महामार्ग

Web Title: Watch of GST teams on MP, Telangana border, goods and service tax department started work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.