विजय कुबडेवर खबऱ्यांची नजर

By admin | Published: January 18, 2017 12:08 AM2017-01-18T00:08:28+5:302017-01-18T00:08:28+5:30

कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवणारा विजय कुबडे पसार झाला असून त्याच्या घरावर पोलीस लक्ष ठेवून आहेत.

Watches watch on Vijay Kubdev | विजय कुबडेवर खबऱ्यांची नजर

विजय कुबडेवर खबऱ्यांची नजर

Next

सावकारी व्यवसायात गौडबंगाल : पोलीस चौकशीला वेग
अमरावती : कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवणारा विजय कुबडे पसार झाला असून त्याच्या घरावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. सोमवारी पोलिसांनी रचलेला सापळा अयशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमिवर कुबडेचा शोध घेण्यासाठी खबऱ्यांची मदत घेतली जात आहे. खबरे कुबडेच्या मागावर असून त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा दावा कोतवाली पोलिसांनी केला आहे.
महादेव कुबडे या परवानाधारक सावकारी पेढीचा प्रोप्रायटर म्हणून शहर कोतवाली पोलिसांनी त्यांचा मुलगा विजय कुबडेभोवती चौकशीचा फास आवळला आहे. त्याच्याविरूद्ध पुरावे गोळा करण्याला पोलिसांनी प्राधान्य दिले असून त्यादृष्टीने तपासाला गती देण्यात आली आहे. सहकारी संस्थेचे उपनिबंधक राजेंद्र पालेकर यांनी महादेव कुबडे परवानाधारक सावकाराविरूद्ध फौजदारी तक्रार नोंदविली होती. त्यानुसार शहर कोतवाली पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपासाला दिशा दिली. आतापर्यंत कुबडे ज्वेलर्स या प्रतिष्ठानातील कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले असून कर्जदारांची यादी हस्तगत करण्यात आली आहे. कर्जदारांची यादी, त्यांच्या गहाण वस्तू व एकंदर दस्तऐवजांवरून कुबडे ज्वेलर्सचा गोरखधंदा उघड होण्यास मदत होणार आहे. त्या दृष्टीने तपास अधिकारी गोकुल ठाकूर यांनी तपासाला गती दिली आहे. पोलिसांनी मंगळवारी विजय कुबडेच्या घरी भेट देऊन त्याचा शोध घेतला. मात्र, ते घरी सापडले नाहीत. (प्रतिनिधी)

नावावरून
पोलीस 'कन्फ्युज'
उपनिबंधक राजेंद्र पालेकर यांनी १२ जानेवारी रोजी महादेवराव नामदेवराव कुबडे (६०, परवानाधारक सावकार, दुकान गांधी चौक) यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. महादेव कुबडे हयात व्यक्ती असल्याचे समजून डायरी अंमलदाराने तक्रार नोंदविली. सुरूवातीचे दोन दिवस महादेव कुबडेंचाच पोलिसांकडून शोध घेण्यात आला. दोन दिवसांनी या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक गोकुल ठाकूर यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी केलेल्या चौकशीत महादेव कुबडे नावाची परवानाधारक सावकाराची फर्म असल्याचे लक्षात आले. त्यापूर्वी पोलिसांनी पाठविलेल्या ‘डेली क्राईम रिपोर्ट’मध्ये महादेवराव कुबडे यांना हयात मानून त्यांचे वय, पत्ता व इतर माहिती देण्यात आली. महादेवराव कुबडे यांनाच आरोपी संबोधण्यात आले. प्रत्यक्षात महादेवराव कुबडे यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महादेव कुबडे हे परवान्यावरील नाव कायम ठेवत त्यांचा मुलगा विजय याने महादेव कुबडे या फर्मच्या नावे प्रोप्रायटर म्हणून नव्याने सावकारी परवाना घेतला.

Web Title: Watches watch on Vijay Kubdev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.