जलसंधारणचा पेपर फुटला! अधिकाऱ्यानेच उत्तरे पुरविल्याचा झाला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 05:42 AM2024-02-22T05:42:58+5:302024-02-22T05:43:08+5:30
केंद्रावरच मृद व जलसंधारण विभागाच्या एका अधिकाऱ्याने संबंधित परीक्षार्थ्याला उत्तरे पुरविण्यास मदत केल्याचा आरोप इतर परीक्षार्थ्यांनी केला.
अमरावती : राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातील गट ब (अराजपत्रित) अधिकारी पदाच्या परीक्षेवेळी बुधवारी शहरातील सिटी लँड येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याचा आरोप परीक्षार्थ्यांनी केला. केंद्रावरच मृद व जलसंधारण विभागाच्या एका अधिकाऱ्याने संबंधित परीक्षार्थ्याला उत्तरे पुरविण्यास मदत केल्याचा आरोप इतर परीक्षार्थ्यांनी केला.
यश अनंत कावरे नामक परीक्षार्थ्याला मृद व जलसंधारण विभागात कार्यरत अधिकाऱ्याने उत्तरे पुरविल्याचा तसेच संबंधित परीक्षार्थ्याचे उत्तरे नमूद केलेले प्रवेशपत्र फाडल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेकडून होत आहे.
अशी उघड झाली पेपरफुटी
शहरातील सिटी लँड येथील ऑनलाइन परीक्षा केंद्रावर पहिल्या पाळीत यश कावरे नामक परीक्षार्थ्याच्या प्रवेशपत्रावर ज्या ठिकाणी सूचना दिलेल्या असतात, त्या ठिकाणी ए, बी, सी, डी अशा स्वरूपात उत्तरे नमूद असल्याचे दिसून आले. इतर सर्व विद्यार्थ्यांना रंगीत प्रवेशपत्राची प्रत मागितली असताना त्या परीक्षार्थ्याकडे ब्लॅक अँड व्हाइट प्रत कशी, असाही प्रश्न उपस्थित झाला.
विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र ओढल्याने फाटले