जलव्यवस्थापन सभेचा ऐनवेळी मोडला डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2016 12:02 AM2016-06-04T00:02:08+5:302016-06-04T00:02:08+5:30
जिल्हा परिषदेत शुक्रवारी दुपारी ३ वाजता जलव्यवस्थान समितीची सभा विविध विषयाला अनुसरून डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात बोलविण्यात आली होती.
सभा स्थगित : उपस्थित सदस्यांचाही हिरमोड, तयारी क्षणात गुंडाळली
अमरावती : जिल्हा परिषदेत शुक्रवारी दुपारी ३ वाजता जलव्यवस्थान समितीची सभा विविध विषयाला अनुसरून डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात बोलविण्यात आली होती. यासाठी प्रशासनाने सभागृहात जय्यत तयारी केली मात्र अचानक पदाधिकारी यांच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सभा स्थगित करावी लागली. त्यामुळे क्षणभरात सज्जलेल्या सभेसाठीचा डाव ऐनवेळी गुंडाळण्याची वेळ प्रशासनावर आली.
पदाधिकाऱ्यांना सवळ असेल तर सभा घ्यायची त्यासाठी पदाधिकारी यांनीच सभेचा मुहूर्त काढायचा आणि वेळेतच सभा गुंडाळायची, असा प्रकार झाला. जिल्हा परिषदेच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात बरेचदा स्थायी, जलव्यवस्थापन व अन्य समितीच्या मासिक सभा रद्द झाली आहे. गुरूवारी स्थायी समितीची सभा काही कारणास्तव रद्द करण्यात आली. त्यामुळे जलव्यस्थापन समितीची सभा होणार आहे. त्यासाठी जलव्यवस्थापन समितीची मेळघाटातील सदस्य जिल्हा परिषदेत हजर झाले. सभेसाठी प्रशासनाने सभागृहात तयारीही केली. आणि ठरलेल्या वेळेनुसार सिंचन, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे स्विय सहायकही सभेचे प्रोसीडींग लिहिण्यासाठी सभागृहात बसले होते. प्रतीक्षा होती केवळ पदाधिकारी येण्याची. परंतु ऐनवेळी जबाबदाऱ्यांचा भ्रमणध्वनी व लॅडलाईवर फोन वाजला आणि आजची जलव्यवस्थापन समितीची सभा स्थगीत झाल्याचा निरोप संबंधित समिती सदस्य व अधिकाऱ्यांना पोहचला. त्यामुळे सभेसाठी मांडलेला सजावटीचा डाव गुंडाळला गेला.