टंचाईग्रस्त गावांचे पाण्यासाठी नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 12:17 AM2017-06-22T00:17:22+5:302017-06-22T00:17:22+5:30
बडनेरा मतदारसंघातील टंचाईग्रस्त गावांमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आ. रवि राणा यांनी मंगळवारी या भागाची पाहणी केली.
रवि राणांचा पुढाकार : जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा मतदारसंघातील टंचाईग्रस्त गावांमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आ. रवि राणा यांनी मंगळवारी या भागाची पाहणी केली. पाणी टंचाई भासू नये, यासाठी विहिरी, बोअरवेलमधून पाणी पुरवठा करण्याचे निर्देश आ. राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आसरा, निंभा, वासेवाडी, वडाळा, घातखेडा, गौरखेडा, सायत, गणोरी, दाढी, पेढी, हातुर्णा, शिवणी, शिपगाव, सातुर्णा, खालकोनी, जसापूर, हरताळा आदी गावांचा दौरा करण्यात आला आहे. या गावात विहिरींवर बोअरवेलने पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आ. राणा यांनी दिल्या आहेत. तसेच जलयुक्त शिवार योजनेतील कामे पावसाळापूर्वी करण्यात यावे, असेही त्यांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांना सांगितले. गावांची पाहणी आटोपल्यानंतर आ. राणांनी शेतमजुरांसह जेवणाचा आस्वाद घेतला.