चारघड प्रकल्पातून नदीपात्रात सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 10:05 PM2018-04-28T22:05:44+5:302018-04-28T22:05:59+5:30

चारघड प्रकल्पातून नदीत पाणी सोडण्याची मागणी काठावरील खेड, उदखेड, खोपडा, बोडणा, लाडकी, शिरखेड आदी गावांतून होत होती. त्यांच्या मागणीची दखल घेत आ. अनिल बोंडे यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या दिला.

Water released from Charghad project in river basin | चारघड प्रकल्पातून नदीपात्रात सोडले पाणी

चारघड प्रकल्पातून नदीपात्रात सोडले पाणी

Next
ठळक मुद्देअनिल बोंडे यांचा पाठपुरावा : ग्रामस्थांसह जनावरांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : चारघड प्रकल्पातून नदीत पाणी सोडण्याची मागणी काठावरील खेड, उदखेड, खोपडा, बोडणा, लाडकी, शिरखेड आदी गावांतून होत होती. त्यांच्या मागणीची दखल घेत आ. अनिल बोंडे यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या दिला. परिणामी प्रशासनाने प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडले. यामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्यामुळे ग्रामस्थांना पेयजलासह मुक्या जनावरांनाही दिलासा मिळाला.
यानिमित्त शुक्रवारी चारघड धरणावर जलपूजन कार्यक्रम झाला. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अजय आगरकर, जि.प. सदस्य सारंग खोडस्कर, संजय घुलक्षे, जिल्हा समन्वयक दिनेश शर्मा, देवकुमार बुरंगे, सरपंच नंदकुमार निंभोरकर, सरपंच सुनीता झटाले, उपसरपंच हजीफभाई, सदस्य आदी उपस्थित होते.

Web Title: Water released from Charghad project in river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.