अचलपूर-परतवाड्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:01:15+5:30

जे काही पाणी येत आहे त्या पाण्याला फोर्सच नाही. पाण्याच्या टाक्या भरण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तासंतास पाण्याची वाट बघितल्यानंतर दोन-चार बकेटा पाणी उपलब्ध होते. तेही पिण्यास अयोग्य, दूषित, गढूळ, तर काही भागात पाणीच पोहचत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. देवगाव ते परतवाडा दरम्यान फातीमा कॉन्व्हेंटसमोर सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या लिकिजेसमधून दररोज लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे.

Water scarcity in Achalpur-Paratwada | अचलपूर-परतवाड्यात पाणीटंचाई

अचलपूर-परतवाड्यात पाणीटंचाई

googlenewsNext
ठळक मुद्देनळाची धार बारीक । गळतीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष

अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर - परतवाडा शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यात नळाची धार बारीक असून काही भागात नळातून पाणी येत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
अचलपूर नगर पालिकेकडून जुळ्या शहराला चंद्रभागात धरणावरून पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान जुळ्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला लिकिजेसमुळे ठिकठिकाणी गळती लागली आहे. मात्र, नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. अनेक कारण पुढे करीत लिकिजेस, गळती थांबवायला नगरपालिका तयार नाही.
जे काही पाणी येत आहे त्या पाण्याला फोर्सच नाही. पाण्याच्या टाक्या भरण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तासंतास पाण्याची वाट बघितल्यानंतर दोन-चार बकेटा पाणी उपलब्ध होते. तेही पिण्यास अयोग्य, दूषित, गढूळ, तर काही भागात पाणीच पोहचत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. देवगाव ते परतवाडा दरम्यान फातीमा कॉन्व्हेंटसमोर सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या लिकिजेसमधून दररोज लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. शहरांतर्गत असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनवरही लिकिजेस आहेत. हे पाईप तुटल्याने शहरात सर्वत्र पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

दूषित पाणीपुरवठा
अथक प्रयत्नानंतर नागरिकांना दोन चार बकेटा पाणी मिळते, तेही दूषित आहे. पाईप लाईनला गटारात लिकेजेस आहेत. त्यामुळे नाल्यातील, गटारातील, दूषित पाणी त्या पाईप लाईनमध्ये शिरून ते नागरिकांना नळाद्वारे मिळत आहे. चंद्रभागेच्या पाण्यासोबतच जवळपास १६ ट्यूबवेलचे थेट पाणी पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनमधून सोडले जात आहे. या ट्युबवेलमधील पाण्यावर शुद्धीकरणाची कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. दूषित पाणी शहरवासीयांना पुरविले जात आहे.

अतिरिक्त पाण्याची उचल
चंद्रभागा धरणातून पाणी घेताना ज्या मीटरद्वारे अचलपूर नगरपरिषद पाणी घेते ते मीटर अनेक दिवसांपासून बंद आहे. त्याची दुरुस्ती अद्याप नगरपरिषदेने केलेली नाही. बंद मीटर बदलविले नाही. नेमक्या या बंद मीटरचा फायदा घेत नगरपालिकेने त्या धरणातून मंजूर पाण्यापेक्षा अतिरिक्त पाण्याची उचल केली आहे. ही बाब पाटबंधारे विभागाने नगरपरिषदेच्या लक्षात आणून दिली असून, मीटर दुरुस्तीबाबत नगररिषदेला पत्रही दिले आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाने या घटनेला गांभीर्याने घेतल्यास भविष्यात शहरातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Web Title: Water scarcity in Achalpur-Paratwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.