पाणीटंचाई आराखड्याची मुदत संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:30+5:302021-07-03T04:09:30+5:30
अमरावती : यंदाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याची मुदत ३० जून रोजी संपली असली तरी मंजूर उपाययोजनांची कामे सुरूच ठेवणार ...
अमरावती : यंदाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्याची मुदत ३० जून रोजी संपली असली तरी मंजूर उपाययोजनांची कामे सुरूच ठेवणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, पावसाळ्यात जून महिन्यानंतरही १९ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये मागील अनेक वर्षांपासून पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले आहे. अनेक गावांमधील नागरिकांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. पाणीटंचाई भासणार नाही, असा अंदाज यंदा होता. त्यामुळे पाणीटंचाईच्या कृती आराखडा १८ कोटींचा होता. चिखलदरा तालुक्यात मध्यंतरी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ते शक्य झाले नाही. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उपायोजना पाणीटंचाई निर्मूलनासाठी केल्या जातात. त्यामुळे आता तरी किमान स्थायी स्वरूपाच्या पाणीपुरवठा योजना तयार करून मेळघाटातील धारणी व चिखलदरा या तालुक्यातील पाणीटंचाई कायमस्वरूपी मुक्त करण्याची गरज आहे.
बॉक्स
प्रगतिपथावर कामे
नळ योजनांची विशेष दुरुस्ती ४८
तात्पुरती पूरक नळ योजना १७
कूपनलिका, विंधन विहिरी ४८
टँकरची संख्या १९
विहीर अधिग्रहण १२८