मुख्याधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वॉर्डा-वाॅर्डात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:01+5:302021-05-31T04:11:01+5:30

धारणी : उन्हाळ्याची दाहकता वाढताना, धारणी नगरपंचायतीअंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी, बोअर हँडपंपाच्या पाण्याची पातळी मार्च महिन्यापासूनच ...

Water scarcity in wards due to negligence of the Chief Minister | मुख्याधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वॉर्डा-वाॅर्डात पाणीटंचाई

मुख्याधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वॉर्डा-वाॅर्डात पाणीटंचाई

googlenewsNext

धारणी : उन्हाळ्याची दाहकता वाढताना, धारणी नगरपंचायतीअंतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी, बोअर हँडपंपाच्या पाण्याची पातळी मार्च महिन्यापासूनच खाली उतरली असल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे धारणी शहरात वॉर्डा- वाॅर्डातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे याबाबत उन्हाळ्याआधी प्रभारी मुख्याधिकारी यांनी नियोजन करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे सध्या शहरातील समाजसेवक विनामूल्य टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा करत आहेत.

धारणी नगरपंचायत क्षेत्राअंतर्गत एकूण १७ वॉर्डातील नागरिकांच्या घरी नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे नळ कनेक्शन आहे. त्यासाठी पाणी पुरवठ्यचे स्रोत विहीर, बोअरवेल हँडपंप या माध्यमातून शहरात नळयोजना माहे जानेवारीपर्यंत सुरळीत सुरू राहते. फेब्रुवारीपासून उन्हाळ्याची दाहकता सुरू झाल्यावर पाण्याच्या स्रोतांची पातळी खाली जाते. त्यामुळे विहीर, बोअरवेल हँडपम्पामधून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यासाठी उन्हाळ्याआधीच शहरातील पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करणे गरजेचे असते. परंतु नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी ते नियोजन केले नाही. त्यामुळे वॉर्ड क्र. १२ १३ १६ १७ १० या अनेक वॉर्डातील नागरिकांना मागील दोन महिन्यापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणी टंचाईग्रस्त सर्व वाॅर्डांकरिता शहरातील कालीमाता मंदिराजवळ नगरपंचायतीची बोअरवेल आहे. त्या बोअरवेलमधील पाण्याची पातळी खाली गेल्याने पाच वाॅर्डात पाणीपुरवठा सुरळीत चालू नाही. त्यामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकत असून प्रत्येकाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिक पाणीटंचाई निर्माण होत असल्याच्या तक्रारी नगरपंचायत प्रशासनाला वारंवार देत आहेत. परंतु धारणी न. प. ही प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर असल्याने त्या तक्रारीची दखल कोणीही घेत नसल्याचे दिसून येत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहरातील काही समाजसेवकांनी पुढाकार घेऊन अनेक वाॅर्डात मोफत टॅंकरने पाणी पुरवठा करणे सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. पण नगरपंचायत प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे.

यांच्याकडून सुरू आहे नि:शुल्क पाणीपुरवठा...

शहरातील अनेक वॉर्डा-वाॅर्डात नगरपंचायतीचा पाणीपुरवठा बंद असल्यामुळे धारणीतील सुनील चौथमल, गोपु चौथमल, सतीश मालवीय, रफिक मेमन या समाजसेवकांकडून स्वतःच्या टँकरने टंचाईग्रस्त वाॅर्डात नि:शुल्क पाणी पुरवठा करणे सुरू आहे.

बाईट

मुख्याधिकाऱ्यांना व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दरवर्षीच्या उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याची पातळी खाली होते हे माहीत असताना सुद्धा, त्यांनी परिसरातील विहीर, बोअरवेल अधिग्रहित केले नाहीत. त्यामुळे आज आम्हाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याला मुख्याधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाच जबाबदार आहे.

- रेहना परवीन सय्यद अशपाक

महिला नागरिक वॉर्ड क्र. १२ धारणी

Web Title: Water scarcity in wards due to negligence of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.