पश्चिम विदर्भातील ५६ तालुक्यांच्या भूजलात घट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 04:25 PM2018-04-18T16:25:53+5:302018-04-18T16:25:53+5:30
विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाचा तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत सरासरी ० ते ३ मीटरपर्यंत कमी आलेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा ६८० निरीक्षण विहिरींच्या नोंदीनंतर धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
- गजानन मोहोड
अमरावती - विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाचा तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत सरासरी ० ते ३ मीटरपर्यंत कमी आलेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा ६८० निरीक्षण विहिरींच्या नोंदीनंतर धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
राज्यातील भूगर्भीय स्थिती पाहता ८२ टक्के भूभाग हा ‘बेसाल्ट’ या कठीण खडकाने व्यापलेला आहे. यात पाणी साठविण्याची क्षमता फार कमी झालेली आहे. मात्र, यात भेगा व सांधे निर्माण झाल्याने या खडकात साठवण क्षमता निर्माण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्भीय स्थितीवर झालेल्या पर्जण्यमानाचे भूजलात रूपांतर होणे पूर्णपणे अवलंबून असते. दरवर्षी निर्माण झालेल्या भूजल साठ्यातून सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी, तसेच शहरीकरण व वाढती लोकसंख्येसाठी वाढत्या मागणीमुळे भुजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे व याचा भूजल पातळीच्या स्थितीवर परिणाम होत आहे. पणिामी पुढील काळासाठी पाणीटंचार्ई निर्माण होत आहे.
सद्यस्थितीत २१ तालुक्यांची ० ते १ मीटरपर्यंत भूजल पातळी कमी झाली, यात बुलडाणा जिल्ह्यातील सर्वाधिक १३ व अमरावती जिल्ह्यातील ६ तालुक्ये आहेत. १ ते २ मीटरपर्यंत २० तालुक्यांची भूजल पातळीत कमी आली. यात सर्वाधिक ९ तालुक्ये यवतमाळ, अमरावती व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी पाच तालुक्यांचा समावेश आहे. २ ते ३ मीटरपर्यंत १३ तालुक्यांच्या भूजलात कमी आली. यात सर्वाधिक सात तालुक्ये यवतमाळ जिल्ह्यातील व अकोल्यातील चार व अमरावती जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश आहे तसेच तीन मीटरपेक्षा जास्त भूजलात कमी दोन तालुक्यात ााहे यात अकोला व अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी एक तालुक्याचा समावेश आहे.
राज्यातील २८ टक्के क्षेत्र पाणवहन
राज्यातील मुख्य नद्यांच्या खोºयाची १,५३१ पाणलोट क्षेत्रात विभागणी करण्यात आली व याची देखील पुन्हा तीन क्षेत्रात विभागाणी करण्यात आली. यामध्ये २८ टक्के म्हणजेच ८६,१५३ चौ.किमी पाणवहन क्षेत्र आहे. ४४ टक्के महणजेच १,३५,३८३ चौ.किमी पुनर्भरण क्षेत्र तर २८ टक्के म्हणजेच ८६,१५३ चौ.किमी हे साठवण क्षेत्र आहे. व यात ८२ टक्के बाग हा बेसाल्ट पाषाणाचा असल्याने त्यात पाणी साठवण क्षमता फारच कमी प्रमाणात आहे.
पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा किमी पाऊस झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात भूजल पुनर्भरण झालेले नाहीत. भूजलाचा उपसा अधिक असल्याने भूजलातील पातळीत घट झालेली आहे.
- डॉ. पी.व्ही. कथने,
उपसंचालक, जीएसडीए