पाणीटंचाई : कुचराई नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:58 PM2018-12-29T22:58:35+5:302018-12-29T22:58:49+5:30

यावर्षी मान्सूनने फिरविलेली पाठ व वाढत्या टंचाई परिस्थितीमुळे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा दृष्काळ जाहीर केला आहे. टंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना कराव्यात, यात कुचराई नकोच, अशी ताकीद जलव्यवस्थापन समिती सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिली.

Water shortage: Disrespect | पाणीटंचाई : कुचराई नकोच

पाणीटंचाई : कुचराई नकोच

Next
ठळक मुद्देनितीन गोंडाणे : जलव्यवस्थापन समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यावर्षी मान्सूनने फिरविलेली पाठ व वाढत्या टंचाई परिस्थितीमुळे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा दृष्काळ जाहीर केला आहे. टंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना कराव्यात, यात कुचराई नकोच, अशी ताकीद जलव्यवस्थापन समिती सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिली.
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून शनिवारी झेडपीच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कु कडे, समिती सदस्य अनिता मेश्राम, पार्वती काठोळे, गौरी देशमुख आदी उपस्थित होते. पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढत आहे. ठिकठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटले आहे. त्यामुळे विहीर अधिग्रहण, कुपनलिका, आवश्यक त्या ठिकाणी पाणीपुरवठ्याचे टँकर आदी पाणीपुरवठा संबंधित उपाययोजना प्रशासनाने कराव्यात. पाणीटंचाई संदर्भातील तक्रारींचे वेळीच निराकरण कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मोर्शी तालुक्यातील ७० गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी ५६ गावांचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. याला मंजुरी मिळताच ही योजना तातडीने सुरू करावी, अशी सूचना उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी केली. त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी दिले. सिंचन विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेची कामे सर्वत्र सुरू आहेत. परंतु ही कामे करताना उद्घाटनासाठी जि.प. सदस्यांना प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रित करणे आवश्यक आहे. मात्र, अशावेळी त्यांना डावलण्यात आल्याचा मुद्दा गौरी देशमुख यांनी मांडला. यापुढे जिल्हा परिषद सदस्यांना कार्यक्रमांना बोलविण्याचे दृष्टीने प्रशासनाने खबरदारी घेण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. सभेला उपमुख्यकार्यकारी अधिकारी नारायन सानप, मुख्यलेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले, रोहयोच्या डेप्युटी सीईओ माया वानखडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर व सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वीज कापण्यास मनाई
शेतकरी दुष्काळी स्थितीचा सामना करत आहेत. जिल्ह्यात काही मंडळांत दुष्काळ जाहीर झाला असताना ऐन रबी हंगामात महावितरणकडून कृ षी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. दुष्काळी स्थिती लक्षात घेता कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी केली. त्यावर वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सूृचना गोंडाणे यांनी सदर अधिकाºयांना केली.

Web Title: Water shortage: Disrespect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.