३५ लघु प्रकल्प कोरडे पडल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई!

By जितेंद्र दखने | Published: May 16, 2024 11:37 PM2024-05-16T23:37:34+5:302024-05-16T23:38:00+5:30

जिल्ह्यात आजघडीला ४३ टक्के पाणीसाठा शिल्लक

Water shortage in many villages due to drying up of 35 small projects! | ३५ लघु प्रकल्प कोरडे पडल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई!

३५ लघु प्रकल्प कोरडे पडल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई!

अमरावती: सध्या कडक उन्हाळा तापत आहे. सिंचन प्रकल्पातील पाण्याची पातळी उपसा व बाष्पीभवन यामुळे दिवसेंदिवस घसरत आहे. आजघडीला जिल्ह्यात ४३.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यातील सात मध्यम प्रकल्पात ३७.४८ तर ४५ लघु प्रकल्पात ३६.३२ टक्के जलसाठा असून यातील सुमारे ३५ लघु प्रकल्प मात्र कोरडे पडले आहेत. तर अन्य लघु प्रकल्पातील जलसाठ्यात कमालीची घट होत आहे. त्यामुळे आगामी काळात प्रकल्पांवर अवलंबून गावांवर पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दरम्यान जिल्ह्यात अवकाळी पडत असला तरी त्याचा फायदा या प्रकल्पांना होत नाही. आगामी दोन महिन्यामध्ये पाण्याची आणखी समस्या भेडसावणार आहे. सरासरी बघता प्रकल्पातील पाणीसाठा जपून वापरण्याचे आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे. जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह पाणीपुरवठा करता येऊ शकणारे ७ मध्यम व ४५ लघू प्रकल्प आहेत. यातील अप्पर वर्धा धरणावर अमरावती ग्रामीण व वर्धा जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासह अमरावती शहर व औद्योगिक वसाहतीचा पुरवठा अवलंबून आहे. पाणी पुरवठ्याचा सर्वाधिक ताण असलेल्या या धरणात सध्या २७३.६४ दलघमी म्हणजेच ४८.५१ टक्के साठा आहे. तसेच सात मध्यम प्रकल्पांत ९६.०३ दलघमी (१७.४८) टक्के जलसाठा आहे. 

मध्यम प्रकल्पांवर तालुका व प्रामीण पाणीपुरवठा अवलंबिला आहे. लघू प्रकल्पांच्या काही प्रकल्पांची जलसाठ्याची स्थिती बऱ्यापैकी असली तरी त्यात ७६.०३ दलघमी म्हणजेच ३६.३२ टक्केच जलसाठा आहे. कडक उन्हाळ्याचा मे महिन्याचे पंधरा दिवस व संपूर्ण जून महिना असे दिड महिने पाणी पुरवठ्यावरील ताण बघता उपलब्ध जलसाठा पुरेसा असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. मात्र, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश गावांत पाणीपुरवठा हा मध्यम आणि लघु प्रकल्पावर असतो. त्यामुळे अनेक लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामूळे पाणीसाठा आताच अपुरा पडू लागला आहे. 

५३ प्रकल्पाची पाणीसाठा सध्याची स्थिती
प्रकल्प-दलघमी-टक्के
अप्पर वर्धा -२७३.६४-४८.५१
४५ लघु प्रकल्प - ७३.०३- ३६.३२
शहानूर-१८.६३-४०.४६
चंद्रभागा-२४.२५-५८.६९
पूर्णा-२१.४५-६०,६४
 सपन- १९.६१-५०.८०
 पंढरी-११.७४-२०.८१
गर्गा-०,००-०,००
बोर्डी नाला-०.३५-२.८९

Web Title: Water shortage in many villages due to drying up of 35 small projects!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.