टाकरखेड्यात पाणीटंचाई

By admin | Published: April 11, 2017 12:31 AM2017-04-11T00:31:49+5:302017-04-11T00:31:49+5:30

सहा हजार लोकसंख्या असलेल्या टाकरखेडा संभू येथे नागरिकांना केला जाणार पाणीपुरवठा अपुरा असल्याने टंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे.

Water shortage in the tanker | टाकरखेड्यात पाणीटंचाई

टाकरखेड्यात पाणीटंचाई

Next

एक दिवसाआड पाणी : प्रतिव्यक्ती १०० लीटर पाण्याची मागणी
टाकरखेडा : सहा हजार लोकसंख्या असलेल्या टाकरखेडा संभू येथे नागरिकांना केला जाणार पाणीपुरवठा अपुरा असल्याने टंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. एक दिवसाआड नळ येत असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली आहे. यामुळे नागरिकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टाकरखेडा संभू येथे १०५ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा सुरू आहे. गावानुरूप एमबीआर असणे गरजेचे होते. हे मंजूरदेखील झाले होते. परंतु राजकीय पाठबळ कमी पडल्याने एमबीआर गावालगत असलेल्या छोट्याशा गावी रामा येथे नेण्यात आला. त्यावेळी १०० ते १५० नळजोडण्या होत्या. नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत होता. परंतु आता ६०० ते ७०० गावांत कनेक्शन झाले आहे. तसेच रामा येथून येणारा पाणीपुरवठा गावातून जळका हिरापूरलादेखील केला जातो.
गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात होणारा पाणीपुरवठा अत्यल्प असल्यामुळे गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातही पाणीपुरवठा विभागाने आठवड्यातून केवळ चारच दिवस पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सध्या प्रतिव्यक्ती सध्या ४० लीटर पाणी दिले जात आहे. ते १०० लीटर करावे जेणेकरून पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. (वार्ताहर)

लिकेजची समस्या
रामा येथील एमबीआरमधून टाकरखेडला पाणीपुरवठा केला जातो. परंतु सदरची पाईपलाईन निकृष्ट दर्जाची आहे. त्या परिसरात काळी जमीन असल्याने उन्हाळ्यात या जमिनीमुळेच पाईपलाईन फाटल्या जाते. त्यामुळे दर दोन दिवसानंतर पाईपलाईन लिकेज होते. आधीच पाण्याचा अल्प पुरवठा त्यात पाईप लाईन लिकेजची समस्या होत असल्याने यामुळेदेखील पाणी टंचाई निर्माण होत आहे. या सदरची पाईपलाईन ही डीआयजी गुणवत्तेची असणे गरजेचे आहे.

Web Title: Water shortage in the tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.