पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत सरासरी ६३ टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 06:45 PM2019-09-14T18:45:33+5:302019-09-14T18:45:57+5:30
पश्चिम विदर्भातील मोठे, लघु व मध्यम अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे.
- संदीप मानकर
अमरावती - पश्चिम विदर्भातील मोठे, लघु व मध्यम अशा एकूण ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांतसुद्धा सरासरी ७०.२९ टक्के पाणीसाठा साचला आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ६७.१३ टक्के पाणीसाठा असून, ४६९ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ४९.९५ टक्के पाणीसाठा आहे.
मागील चार दिवसांपासून सार्वत्रिक पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत आहे. विदर्भात पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. परतीच्या पावसात अनेक प्रकल्प शंभरी गाठतील, असा अंदाज जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वर्तविला आहे.
जलसंपदा विभागाने १४ सप्टेंबरच्या सकाळी ७ वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार ५०२ प्रकल्पांत सरासरी ६२.७७ टक्के पाणीसाठा साचला आहे. या प्रकल्पांत प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ३१७४.११ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा १९९२.३० दलघमी आहे. दोन आठवड्यांत आणखी पाणीसाठ्यात वाढ होणार असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.
नऊ मोठ्या प्रकल्पांत ७०.२९ टक्के पाणीसाठा
अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्प १०० टक्के भरला असून तीन गेट १० सेमींने उघडले आहेत. वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदा धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्यामुळे अमरावती शहरातील पिण्याच्या पाण्यासह या प्रकल्पातून होणाºया ७५ हजार हेक्टर सिंचनाची सोय झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस या मोठ्या प्रकल्पात ४३.६३ टक्के पाणीसाठा आहे. अरुणावती प्रकल्पात १२.९९ टक्के, बेंबळा प्रकल्पात ९८.३४ टक्के पाणीसाठा असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात काही प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली असून २३.३९ पाणीसाठा आहे. टक्के, वान प्रकल्पात ९३.४६ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ३४.५५ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ९४.२० टक्के पाणीसाठा असून दोन गेट १० सेंमीने उघडण्यात आले आहे. खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.
२४ मध्यम प्रकल्पांत ६८ टक्के पाणीसाठा
अमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ९४.४० टक्के पाणीसाठा असून ७.५ सें.मी. ४ गेट उघडले आहेत. चंद्रभागा प्रकल्पात ९३.९९ पाणीसाठा असून ५ सेंमीने दोन गेट उघडले आहे. पूर्णा प्रकल्पात ९१.३८ टक्के पाणीसाठा असून १५ सेंमीने दोन गेट उघडण्यात आले आहे. सपन प्रकल्पात ९६.२७ टक्के पाणीसाठा असून १० सेंमीने चार गेट उघडले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस मध्यम प्रकल्पात ९७.६४ टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ५२.८९ टक्के, वाघाडी ७६.५० टक्के, बोरगाव ८९.७१ टक्के नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्हा निर्गुणा ३४.११ टक्के, मोर्णा ३८.८१टक्के. उमा २५.२६ टक्के, घुंगशी बॅरेजमध्ये पहिल्यांदाच २६.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. वाशीम जिल्ह्यातील अडाण १३.३४ टक्के, सोनल ४१.३७ टक्के, एकबुर्जी ४९.७१ टक्के, बुलडाणा जिल्हा ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के, मन ६१.२३ टक्के, तोरणा ९६.२० टक्के उतावळी ६५.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.